Monsoon Update : दक्षिण-पश्चिम मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी दिली.
ADVERTISEMENT
यंदाचा मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा आधी म्हणजेच 13 मे रोजी या भागात पोहोचला आहे. गेल्या सात वर्षांत सर्वात लवकर मान्सून आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सामान्यतः दक्षिण अंदमान समुद्र आणि पोर्ट ब्लेअरमध्ये 21 मे रोजी दाखल होतो. पण यंदा मान्सूचं आगमन लवकर झालंय.
अंदमान बेटांवर मान्सून दाखल
हे ही वाचा >> ज्या सोफिया कुरैशींचं देशभर कौतुक होतंय, त्यांना भाजप मंत्री म्हणाला 'ती त्यांचीच बहीण', प्रकरण काय?
हवामान विभागाने सांगितलं की, पुढच्या तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, उर्वरित अंदमान समुद्र आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये दाखल होईल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
सोमवारपासून निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बेटांवर सातत्यानं पाऊस पडतोय. हा पाऊस हा मान्सूनच्या सुरुवातीचे चिन्ह म्हणून पाहिला जातो.
हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!
दरम्यान, पुढच्या काही दिवसांत मान्सूनच्या देशातील इतर भागांमध्येही पोहोचणार आहे. हवामान खात्यानं शेतकऱ्यांना तयारीत राहण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रात आज अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वर्धा, वाशीम, गोंदिया, भंडारा, अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाने केला आहे. एकूणच यामुळे यंदा महाराष्ट्रातही मान्सून लवकर पोहोचण्याचे चिन्ह आहेत.
ADVERTISEMENT
