ज्या सोफिया कुरैशींचं देशभर कौतुक होतंय, त्यांना भाजप मंत्री म्हणाला 'ती त्यांचीच बहीण', प्रकरण काय?
BJP Minister Vijay Shah : भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रा यांनी जगाला दिली. 'ऑपरेशन सिंदूर' बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी मोठा वाद निर्माण केलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाजप मंत्र्याचं सोफिया कुरैशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

सोफिया कुरैशी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद

भाजप मंत्र्याच्या राजीनाम्याची होतेय मागणी
BJP Minister Reaction on Sofia Qureshi : अतिरेकी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. भारताच्या या संपूर्ण ऑपरेशनची माहिती कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी जगाला दिली. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी मोठ्या धाडसाने ही जबाबदारी पार पाडली. जगभरात त्यांचं कौतुक होत असताना, भाजपच्या मंत्र्यांना मात्र त्यांच्याबद्दल बोलताना गरळ ओकली आहे.
हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!
'ऑपरेशन सिंदूर' बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी मोठा वाद निर्माण केलाय. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रा यांनी जगाला दिली. मात्र, शाह यांनी इंदूरजवळील रामकुंडा गावात एका सभेत बोलताना कथितपणे कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर निशाणा साधत आक्षेपार्ह टिप्पणी केली.
भाजपच्या मंत्र्यानं काय गरळ ओकली?
शाह म्हणाले, "ज्या दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्यात आपल्या बहिणींचे सिंदूर पुसलं, त्यांचा बदला घेण्यासाठी आपण त्यांच्याच बहिणीला पाठवलं." असं शाह म्हणाले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, ते म्हणाले "दहशतवाद्यांनी आपल्या हिंदू बांधवांचे कपडे काढून त्यांना मारलं. पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्याच समुदायातील त्यांच्या बहिणीला सैन्याच्या विमानातून पाठवून त्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवला. त्यांनी आपल्या बहिणींना विधवा केलं, तेव्हा मोदीजींनी त्यांच्याच समुदायातील बहिणीला पाठवून त्यांना उघडं केलं आणि धडा शिकवला."
हे ही वाचा >> 'आम्ही घरात घुसून मारू, जिवंत सोडणार नाहीत...', PM मोदींच्या 'या' विधानाचा अर्थ काय?
दरम्यान, या वक्तव्यावरुन आता मोठं वादंग निर्माण झालं आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी X वर शेअर करत शाह यांच्या "विचारसरणी"वर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे या टिप्पणीबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली.
वाद वाढल्यानंतर शाह यांनी खुलासा करताना म्हटलं, "माझ्या भाषणाचा वेगळा अर्थ लावू नका. हे तुम्ही ज्या संदर्भात विचार करत आहात तसं नाही. त्या आपल्या बहिणी आहेत. त्यांनी सैन्यासोबत मोठ्या ताकदीने बदला घेतला आहे." या प्रकरणाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, शाह यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.