बांगलादेशचं नाव घेत सत्ता बदलावर मोहन भागवत यांचं मोठं विधान

मुंबई तक

• 11:20 AM • 20 Oct 2026

Mohan Bhagwat Speech : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात उपस्थितांना नागपूरमध्ये संबोधित केले. देश आणि जगभरात सुरू असलेल्या आंदोलनांना असुरी शक्त असे म्हटले आहे. यामुळे सत्ता बदल होईल आणि परिस्थिती बदलेल असं नाही. यापूर्वी कधीही असे घडले नाही आणि यापुढे घडणार नसल्याचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. 

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?  

point

नेमकं कोणाला म्हणाले असुरी शक्ती? 

Mohan Bhagwat Speech : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात उपस्थितांना नागपूरमध्ये संबोधित केले. देश आणि जगभरात सुरू असलेल्या आंदोलनांना असुरी शक्त असे म्हटले आहे. यामुळे सत्ता बदल होईल आणि परिस्थिती बदलेल असं नाही. यापूर्वी कधीही असे घडले नाही आणि यापुढे घडणार नसल्याचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : आपण विभागले जातो, तेव्हा आपण कमकुवत होतोच, मेळाव्यात मोहन भागवत असे का म्हणाले?

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?  

नागपूरमध्ये एरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमादरम्यान एरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पश्चिमेकडून जगभरात एक वादळ आणले गेले आहे. फ्रान्समध्ये जे काही सुरू आहे, बांगलादेशात जे काही घडले होते, ते नेपाळमध्ये देखील घडले होते, हे सर्व त्यांचेच कृत्य आहे. ते म्हणतात की सत्ता बदलल्याने परिस्थिती बदलेल, असे यापूर्वी कधीही झालेले नाही आणि इथून पुढे होणार नाही. 

नेमकं कोणाला म्हणाले असुरी शक्ती? 

भारतीयांच्या नवीन पिढीमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी भारतातही खंबीर नेतृत्वाखाली असे प्रयत्न सुरू आहेत. आता त्यांचे हे खेळ थांबवण्यात आलेत. या असुरी शक्तींना हे महितीये की, ते महत्त्वकांक्षी नेत्यांचा शोध घेतात, हे आंदोलन उपायासाठी असावे, असे मोहन भागव यांनी मेळाव्यात बोलताना भाष्य केले. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा वारं फिरलं; दुहेरी संकट IMD चा अलर्ट

भारत हा विविधतेनं नटलेला देश 

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, भारतमातेला सर्वोच्च स्थान आहे. देशात विविध पंथ, प्रदेश, जाती, भाषा, खाद्य सवयी आणि चालीरिती आहेत, मात्र आता भारताने एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे. भागवत नंतर म्हणाले की, भूतकाळात एकजुटीने प्रगती केली आणि भविष्यात देखील केली जाईल. नंतर त्यांनी अंमली पदार्थावर भाष्य केलं की, आजची पिढी अंमली पदार्थाच्या आहारी गेली आहे. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे, त्यांनी पालकांना येणाऱ्या पिढीला याबाबत शिक्षित करण्याचे आवाहन केले.