MOTN 2024 : काँग्रेस महाराष्ट्रात 'अच्छे दिन' येणार! पोलने भाजपचं वाढवलं टेन्शन?

भागवत हिरेकर

08 Feb 2024 (अपडेटेड: 08 Feb 2024, 06:42 PM)

Mood of The Nation 2024 Maharashtra : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस किती जागा मिळू शकतात?

महाराष्ट्रात आजघडीला निवडणूक झाल्यास काँग्रेस किती जागा जिंकू शकते?

Maha vikas aghadi will overcome on Mahayuti in lok Sabha 2024 see mood of the nation 2024

follow google news

Mood Of The Nation 2024 Lok Sabha Election Opinion Poll Maharashtra : 2019 च्या लोकसभा निवडणूक चौथ्या क्रमांकावर गेलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात 2024 मध्ये अच्छे दिन येऊ शकतात. 'इंडिया टुडे सी व्होटर'च्या 'मूड ऑफ द नेशन' सर्वेमध्ये काँग्रेस मुसंडी मारू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला किती जागा मिळू शकतात, याबद्दलचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

2019 च्या लोकसभेत कुणाला किती जागा?

2019 मध्ये भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळवता आला होता. काँग्रेसला १ जागा जिंकता आली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. एमआयएम-वंचितने १ जागा जिंकली होती, तर १ उमेदवार अपक्ष निवडून आला होता. 

MOTN 2024 Maharashtra : काँग्रेसने किती लढवल्या होत्या जागा?

आता 2019 च्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात मुसंडी मारणार असल्याचे अंदाजे मूड ऑफ द नेशन सर्व्हेने व्यक्त केला आहे. ते समजून घेण्याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल जाणून घेऊयात.

2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस याची आघाडी होती. आघाडीत काँग्रेसने 26 जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, खूप मोठं अपयश काँग्रेसला आलं होतं. काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून बाळू धानोरकर निवडून आले होते. त्यांचं निधन झाल्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्रात सध्या शून्य खासदार आहेत. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किती मिळू शकतात जागा?

मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली, तर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. सर्व्हेनुसार काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत तब्बल 12 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरला तर महाराष्ट्रात काँग्रेसला संजीवनीच मिळेल. 

महाराष्ट्रात शून्य खासदार असलेल्या काँग्रेसला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळू शकते, असा अंदाज मूड ऑफ द नेशन सर्व्हेतून व

ठाकरे-पवारांना 14 जागा

मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार, महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या दोन्ही पक्ष मिळून 14 जागा मिळू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत 26 जागा जिंकू शकते, असं हा सर्व्हे सांगतो.

    follow whatsapp