Narayan Rane, सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे कोकणातील पत्रकार परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेबाबत बोलताना आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांत स्थानिक निवडणुकांसाठी सिंधुदुर्गात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना युती करणार असल्याची चर्चा रंगलीये. याबाबत पत्रकारांनी नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी तसं झालं तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेशी युती तोडू, असा थेट इशारा दिलाय.
ADVERTISEMENT
आमची युती झाली तर आमच्या 80 टक्के जागा निवडून येतील - नारायण राणे
नारायण राणे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याचं जवळपास ठरलेलं आहे. उद्या याबाबत बैठकी होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल. मला वाटतं ही युती व्हावी. दोन्ही जिल्ह्यात भाजपचा अध्यक्ष बसावा. 80 टक्के जागा युती झाली तर निवडून येतील, असा माझा विश्वास आहे.
हेही वाचा : चुकूनही घोणसचा नाद करु नका, सर्पमित्र येण्याआधी सापाला डिवचलं, पोत्यात भरायला गेला अन् व्हायचं तेच झालं
राज-उद्धव त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र, राणेंची टीका
राज्यात सर्वत्र निवडणुका होऊ घातल्या असून राज्याचे राजकारण सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरे राज्यात दौरा करीत आहेत. शेतकऱ्यांना त्यांनी अडीच वर्षात काय केले. हे त्यांनी आधी सांगावे उद्धव आणि राज जे बोलतात ते आपले अस्तित्व टिकविण्यासाठी बोलत आहेत. त्यांना माहीत आहे की आपली सत्ता येणार नाही. पण तरीही ते टीका करीत आहेत. त्यांनी मुंबई शहराचा कायापालट काय केला? सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती व्हावी. उद्या शक्यतो निर्णय होईल. जिल्ह्यात 80 टक्के जागा घेतील. भाजपचा अध्यक्ष होईल. जिल्ह्यात युती व्हावी. मी असेपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत वाद होणार नाही. सर्वांची मते आहेत की युती व्हावी, जागा वाटप उद्या ठरेल. उद्या फॉर्म्युला माझ्याकडे येईल. रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री पेक्षा नेते आहेत. दोन्ही नेत्यांनी माहिती घ्यावी. आणि मग निर्णय घ्यावा.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











