Namdev Shastri On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. अशातच धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्रींची नुकतीच भेटली. यावेळी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं समोर आलं. त्यामुळे नामदेव शास्त्रींवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कुटुंबियांसह भगवान गडावर नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि हत्याप्रकरणातील पुरावे शास्त्रींना दाखवले. त्यानंतर नामदेव शास्त्रींनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT
माझ्या वडिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आमची परिस्थिती तुम्ही एकदा पाहायला हवी होती आणि नंतर वक्तव्य करायला पाहिजे होतं, असं वैभवी देशमुख नामदेव शास्त्रींना म्हणाल्या. यावर प्रतिक्रिया देताना नामदेव शास्त्री म्हणाले, मी काहीही बोललो नाही. मी तुमच्या पाठिमागे आहे. हा जो प्रकार आहे, तो समाजातील वाईट लोकांनी केलेलं काम आहे. तुम्ही जर भगवानगडाचे शिष्य आहात, मस्साजोग केज तालुका हा बाबांना मानणारा आहे. अनेकवेळा दौरे झाले आहेत. म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही. फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. भगवान गड आपल्या पाठिशी आहे. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो, फास्टट्रॅकवर लवकरात लवकर न्याय मिळावा. भगवान गड हा कायस्वरुपी त्यांच्या पाठिशी उभा राहील.
हे ही वाचा >> Sanjay Raut: "एकनाथ शिंदे भाजपसमोर सरपटणारं प्राणी...", संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात
संतोष देशमुख, धनंजय देशमुखांचं कुटुंबीय भगवान गडावर नामदेव शास्त्रींना भेटायला गेले आहेत, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते अर्जून खोतकर म्हणाले, "नामदेव शास्त्री महाराजांकडे आपली बाजू मांडतील ते..नामदेव शास्त्री मोठे माणसं आहेत. ते समजून घेतील. त्यांनी भूमिका घेतलीय. त्या मुलांचं पालन पोषण भगवान या ठिकाणी करेन. मला असं वाटतं की याला वेगळ्या अर्थाने पाहू नये. धनंजय मुंडेंना पाठराखण करण्याबाबत ते कोणत्या अवस्थेत बोलले माहिती नाही. परंतु, त्या गोष्टीला वेगळ्या अर्थाने पाहू नका".
हे ही वाचा >> नाशिकजवळ भीषण अपघात, 200 फूट खोल दरीत बस कोसळून 7 जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT
