Manoj जरांगेंच्या ‘त्या’ मागणीनंतर छगन भुजबळ आक्रमक, सरकारला थेट दिली धमकी!

मुंबई तक

26 Jan 2024 (अपडेटेड: 26 Jan 2024, 02:39 PM)

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले असले तरी त्याला आमचा विरोध नाही मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने विचारपूर्वकपणे आरक्षण द्यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. नाही तर ओबीसीकडून आंदोलन केले जाईल असा इशारा भुजबळांनी सरकारला दिले आहे.

OBC community agitation minister Chhagan Bhujbal warned the government not to give separate reservation to the Maratha community

OBC community agitation minister Chhagan Bhujbal warned the government not to give separate reservation to the Maratha community

follow google news

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईवर धडक मारली आहे. आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी नाकारल्यानंतर सरकारला जर मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्या असतील तर नोंदी मिळालेल्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी जर मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजावर (OBC Community) अन्याय झाला तर आमचेही आंदोलन सुरु होणार असल्याचा इशाराही भुजबळांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात भुजबळ-जरांगे पाटील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे वाचलं का?

‘ती’ आमचीही मागणी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमचीही मागणी आहे मात्र त्याचा परिणाम ओबीसी समाजाच्या आरक्षणावर होता कामा नये. सरकारनेही मराठा आरक्षणावर दोन्ही बाजूने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं मत व्यक्त करून आरक्षणाबाबत चुकीची मतं मांडली जाऊ नयेत अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा >> जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा, ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज द्या नाहीतर उद्या…’

अन्याय होऊ नये

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अथवा त्यांना आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी नाही, मात्र त्या आरक्षणाचा ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये एवढंच आमचं मत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने विचार करून आरक्षणाची मागणी पूर्ण करावी असंही भुजबळ यांनी सांगितले.

आता वेगळं आरक्षण द्या

मराठा समाजाच्या आंदोलनाने जोर धरलेला असतानाच आणि मुंबईत जरांगे पाटील येऊन धडकल्यामुळे त्यावर आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नसल्याचे सांगितल्यामुळे ओबीसीचे समाजाही आता आक्रमक झाला आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, आरक्षणावरून वाद निर्माण होत असेल तर मराठा समाजाला आता वेगळं आरक्षण द्या असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

    follow whatsapp