Rajan Patil : राजन पाटलांच्या साम्राज्याला हादरा देणारी निवडणुकीमधले ट्वीस्ट संपायचे नाव घेत नाहीयेत. आता अनगरची निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळं आता बरेच सवाल उपस्थित होत आहेत. राजन पाटलांना खरोखर धक्का बसलाय का? प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड रद्द झाली का? अनगरमध्ये पुन्हा निवडणूक होणार का? उज्ज्वला थिटे पुन्हा अर्ज भरणार का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. तर या सर्व प्रश्नांची खरी उत्तरं, तांत्रिकदृष्ट्या स्थगित झालेल्या निवडणुकीची सगळी स्टोरी आणि यामागचं खरंखुरं कारण आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या, हल्ल्यामागे पडळकरांचे कार्यकर्ते?
राजन पाटलांना खरंच धक्का आहे का?
पहिलं म्हणजे राजन पाटलांना किंवा प्राजक्ता पाटलांना हा खरंच धक्का आहे का? तर तांत्रिकदृष्ट्या तरी त्यांना कोणताही धक्का नाही. ते कसं ते आपण पुढे बघणारच आहोत. थिटेंना निवडणूक लढचा येणार आहे का याबाबतही आपल्याला जाणून घ्यायचंय. आपल्याला माहितीय अनगरची निवडणूक प्रचंड गाजली. थिटेंनी सिनेस्टाईल जाऊन पोलिस प्रोटेक्शनमध्ये अर्ज दाखल केला. नंतर तो अर्ज सूचकाची सही नसल्याचं कारण देत बाद झाला. यानंतर अनगरमध्ये राजन पाटील, बाळराजे पाटलांचं सेलिब्रेशन गाजलं. अजित पवारांना चॅलेंज देण्यापर्यंत हे राजकारण गेलं, नंतर माफिनामेही आले. प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळल्याने ही जागा बिनविरोध झाली. त्यातच, आता सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी अनगरनगरपंचायतीची निवडणूक स्थगित केल्याने येथे फेरनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र, ह्या स्थगितीचा भाजप नेते राजन पाटलांना आणि बिनविरोध निवड झालेल्या कुठलाही धक्का बसणार नाही. कारण, केवळ येथील बिनविरोध निवडणुकीची औपचारीक घोषणा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
राजन पाटीलांच्या दहशतीची राज्यभर चर्चा
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. अनगरसह जिल्ह्यातील 6 नगरपालिकेतील 6 प्रभाग आणि 2 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा केल्याने येथील दहशतीची राज्यभर मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार प्रत्येक उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची मुभा असते. मात्र जर निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा कोर्टात अपील झाली तर निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती प्राप्त होते. अनगर प्रकऱणात उज्ज्वला थिटे यांनी आपल्या अर्ज बाद झाल्याच्या विरोधात जिल्हा कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाचा निकाल 26 तारखेला प्रशासनाला प्राप्त झाला. जिल्हा न्यायालयानं थिटेंचा अर्ज बाद करण्याचा निर्णय़ कायम ठेवला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर नियमानुसार अर्ज बाकी राहिलेल्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस अवधी द्यावा लागतो.
हे ही वाचा : मुंबई : कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बिझनेसमन महिलेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन् कपडे काढले अन्..धक्कादायक प्रकार
त्यामुळं आयोगानं काल जाहीर केलेल्या नव्या कार्यक्रमानुसार अनगरच्या नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये एकमेव राहिलेल्या प्राजक्ता पाटील यांना देखील अर्ज माघार घेण्यासाठी संधी दिली आहे. 4 तारखेच्या कार्यक्रमानुसार 10 डिसेंबरपर्यंत त्यांना आपला अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाईल. आता राज्यातील सर्वच स्थगित केलेल्या निवडणुकांसाठी 4 तारखेला कार्यक्रम जाहीर होईल. यात अर्ज मागे घेण्याची मुदत ही 10 डिसेंबर असेल, 20 डिसेंबरला हे मतदान होईल तर 21 रोजी याचा निकाल येणार आहे. आता जर 10 तारखेपर्यंत प्राजक्ता पाटलांनी अर्ज मागे घेतला तर आयोगाला तसे सांगितले जाईल. जर नाही घेतला तर अनगरमध्ये 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष या एकून 18 जागांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज असल्यानं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचा प्रस्तावा निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाला पाठवतील. यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार पुढे ही निवडणूक बिनविरोध घोषित केली जाईल. या प्रक्रियेत उज्ज्वला थिटे किंवा मागे अर्ज घेतलेले्या सरस्वती शिंदे किंवा अन्य कुणालाही नव्याने अर्ज दाखल करता येणार नाहीय. त्यामुळं प्राजक्ता पाटलांनी नगराध्यक्ष म्हणून निवड जवळपास निश्चित आहे, केवळ औॅपचारिक घोषणा तांत्रिक कारणामुळं पुढं ढकलली. त्यामुळं पाटलांना धक्का नाही मात्र विजयाचं सेलीब्रेशनसाठी वाट पाहावी लागणार आहे.
ADVERTISEMENT











