डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवार इंडिया आघाडीत असतील का? राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले...

सुमित भुजबळ

29 Nov 2026 (अपडेटेड: 29 Nov 2026, 09:05 AM)

Rahul Gandhi on Sharad Pawar : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याच्या चर्चेवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi on Sharad Pawar

Rahul Gandhi on Sharad Pawar

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवार इंडिया आघाडीत असतील का?

point

राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले...

Rahul Gandhi on Sharad Pawar : मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्येही वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने या विधेयकाला भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला. शरद पवार गटाने विधेयकाला पाठिंबा दिल्यास इंडिया आघाडीच्या भूमिकेवर त्याचा परिणाम होणार का, असा सवाल करण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे स्थान बदलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हेही वाचा : INDIA आघाडीची बैठक संपली! डिलिमिटेशनबाबत खर्गेंचा मोठा दावा; राहुल गांधी 5 वाजता काय बोलणार?

विधेयकाला पाठिंबा दिला तरी इंडिया आघाडीतील त्यांचे स्थान बदलणार नाही - गांधी 

पत्रकारांनी शरद पवार गटाच्या संभाव्य भूमिकेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, एखाद्या घटक पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिला तरी इंडिया आघाडीतील त्यांचे स्थान बदलणार नाही. त्यांच्या या उत्तरामुळे शरद पवार गटाच्या भूमिकेवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. मात्र, राहुल गांधी यांनी या उत्तरातून शरद पवार किंवा त्यांच्या पक्षावर थेट टीका केली नाही. इंडिया आघाडीतील पक्षांची एकत्रित भूमिका कायम राहणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना भाजपच्या दोन तृतीयांश बहुमताच्या वैधतेबाबतही प्रश्न विचारण्यात आला. भाजपचे दोन तृतीयांश बहुमत कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे तुम्ही म्हणत आहात? मग त्याबाबत कायदेशीर मुद्दे कसे उपस्थित करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.

हेही वाचा : लोकसभेच्या जागांची संख्या 850 का हवी? राहुल गांधींनी उपस्थित केले सवाल

हा गंभीर गुन्हा आहे, राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक आयोगानेच 14 कोटी मतदारांनी बेकायदेशीरपणे मतदान केल्याचे सांगितले असल्याचा दावा त्यांनी केला. भारताची एकूण लोकसंख्या सुमारे 140 कोटी असताना त्यापैकी 14 कोटी लोकांनी मतदान केले, ज्यांनी मतदान करायला नको होते, असे राहुल गांधी म्हणाले. देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा जवळपास 10 टक्के असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाकडूनच अशी बाब सांगितली जात असताना निवडणूक बेकायदेशीर ठरत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा गंभीर गुन्हा असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या भूमिकेपासून ते 2024 च्या निवडणुकीतील मतदानाच्या मुद्द्यापर्यंत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे इंडिया आघाडीतील राजकीय समीकरणांबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.