Rahul Gandhi Speech : “माझी एक आई इथे बसलीये, दुसरीची मणिपूरमध्ये हत्या केली”

भागवत हिरेकर

09 Aug 2023 (अपडेटेड: 09 Aug 2023, 02:37 PM)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. मोदींनी, भारत मातेची मणिपूरमध्ये हत्या केली, असे ते म्हणाले.

no Confidence motion : rahul gandhi speech in lok sabha today.

no Confidence motion : rahul gandhi speech in lok sabha today.

follow google news

Rahul Gandhi speech in Parliament on NO Confidence Motion : मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या प्रस्तावावरील चर्चेत बुधवारी (9 ऑगस्ट) राहुल गांधींनी भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी मणिपूरमधील दोन महिलांचे अनुभव सभागृहात सांगितले. त्यानंतर मणिपूर हिंसेवरून राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करत पंतप्रधान मोदींवर तुम्ही मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या केलीये, असं टीकास्त्र डागलं.

हे वाचलं का?

अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “मी मणिपूरला गेलो होता, पण आपले पंतप्रधान अजूनही गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हे भारत नाहीये. मणिपूर राहिलेलं नाही. मणिपूरची तुम्ही दोन भागात विभागणी केली आहे. मणिपूर तोडले आहे.”

‘डोळ्यासमोर माझ्या मुलाला गोळ्या घातल्या, मी रात्रभर…’

राहुल गांधी लोकसभेत मणिपूर दौऱ्यातील अनुभवही सांगितले. “मी मणिपूरमधील मदत छावण्यांमध्ये गेलो. मी महिलांशी बोललो. मी एका महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती महिला म्हणाली, ‘माझा एकच छोटा मुलगा होता. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी घातली. मी रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ झोपून होते. नंतर मला भीती वाटली. मी माझं घर सोडलं. जे माझ्याजवळ होतं, ते सगळं सोडून दिलं.’ मी त्या महिलेला विचारलं काहीतरी आणलं असेल? त्या महिलेनं सांगितलं, ‘काहीच नाही. माझ्याजवळ फक्त कपडे आहेत.’ तिने इकडे तिकडे शोधलं आणि एक फोटो दाखवला आणि म्हणाली इतकंच माझ्याजवळ राहिलं आहे’, असा अनुभव राहुल गांधींनी सांगितला.

वाचा >> ‘मोदीजी, तुम्ही मणिपूरमध्ये भारताची हत्या केली’, राहुल गांधींनी लोकसभा हादरवली!

राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी दुसऱ्या मदत छावणीत गेलो. मी त्या महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालंय? मी प्रश्न विचारताच ती महिला थरथरायला लागली. तिच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहिले आणि ती बेशुद्ध झाली. हे मी फक्त दोन उदाहरणे दिली आहेत.”

तुम्ही देशभक्त नाहीत, तर देशद्रोही -राहुल गांधी

“अध्यक्ष महोदय, यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केलीये, फक्त मणिपूरची नाही. भारताला मणिपूरमध्ये मारलंय. मणिपूरमध्ये भारताची हत्या केलीये. मी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणालो की, भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. याचा अर्थ भारत मातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारलं. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही. तुम्ही देशप्रेमी नाही आहात, तुम्ही देशद्रोही आहात”, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

‘माझ्या दुसऱ्या आईची मणिपूरमध्ये हत्या केलीये’

“तुम्ही भारत मातेचे रक्षक नाही आहात, तुम्ही भारत मातेचे हत्यारे आहात. आदराने बोलतोय. भारत माझी आई आहे आणि तुम्ही माझ्या आईची हत्या मणिपूरमध्ये केलीये. माझी एक आई इथे बसलीये, माझ्या दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलंय. जोपर्यंत तुम्ही हिंसा थांबवणार नाही, तोपर्यंत दररोज तुम्ही माझ्या आईची हत्या करत राहाल. भारताचे सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते. तुम्ही लष्कराचा वापर करत नाही आहात. कारण तुम्हाला भारताला मणिपूरमध्ये मारायचं आहे”, असा घणाघात राहुल गांधी मोदी सरकारवर केला.

    follow whatsapp