Raj Thackeray on Eknath Shinde 40 MLA, मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाष्य केलंय. "भाजपने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिकेत तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. मग एवढे पैसे असतील शिंदेंसोबत गेलेले आमदार 50 कोटी रुपयांसाठी का पळून गेले?", असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना सामनाला दिलेल्या मुलाखतीत विचारलाय. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भाष्य केलंय.
ADVERTISEMENT
राज ठाकरे शिंदेंसोबत गेलेल्या 40 आमदारांबाबत काय म्हणाले?
संजय राऊतांच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, पहिली गोष्ट मला याबद्दल बोलायचं आहे. 50 खोक्के ..50 खोक्के हे चालू होतं ना.. मला वाटतं लोकांना नीट समजून सांगणे आवश्यक आहे. 50 खोक्के म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 40 आमदार म्हणजे 2 हजार कोटी रुपये झाले. हे पैस कुठून आले? कसे आले? यासाठी बँकेतून लोन तर घेतलं नव्हत ना? त्याच्यामुळे कोणत्या भ्रष्टाचाराबाबत कोणी काय बोलावं? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पाहावी लागली?
राज ठाकरे म्हणाले, काही गोष्टी कशा घडल्या? का घडल्या हे आपण सोडून दिलं पाहिजे. काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे." महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतोय, उद्धवही बोलतोय. परंतु आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे, ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार!"
उद्धव ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











