reservation draw for the Mahapalika mayoral posts : मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज (दि.22) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलीये. महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय.
ADVERTISEMENT
कोणत्या महापालिकेचं महापौर पद कोणासाठी राखीव?
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका - ST (अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
ठाणे - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
जालना - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव)- महिलांसाठी
लातूर - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
पनवेल - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
अकोला - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
अहिल्यानगर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
उल्हासनगर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
कोल्हापूर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
चंद्रपूर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
इचलकरंजी - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
जळगाव - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
मुंबई - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
नवी मुंबई - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
मीरा-भाईंदर - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
पुणे - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
पिंपरी-चिंचवड - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
सांगली - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
सोलापूर - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
छत्रपती संभाजीनगर - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
नाशिक - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
नागपूर - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
नांदेड - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
वसई-विरार - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
धुळे - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
मालेगाव - Open (खुला प्रवर्ग) - महिलेसाठी राखीव
भिवंडी - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
अमरावती - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
परभणी - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
जालना महापालिकेत या महिला नगरसेवकांपैकी एका महिलेची लागू शकते महापौर पदी वर्णी (SC प्रवर्ग महिलांसाठी राखीव)
डॉ. रिमा काळे - भाजप
वंदा मगरे - भाजप
श्रद्धा साळवे - भाजप
जळगाव महापालिकेत या महिला नगरसेवकांपैकी एका महिलेची लागू शकते महापौर पदी वर्णी (OBC प्रवर्ग महिलांसाठी राखीव)
दीपमाला काळे - भाजप
सुचेता हाडा - भाजप
वैशाली पाटील - भाजप
कल्याण-डोंबिवली महापालिकेत या नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाची लागू शकते महापौर पदी वर्णी (ST प्रवर्ग - सर्वसाधारण राखीव)
हर्षाली थविल - शिवसेना (शिंदे गट)
किरण भांगले - शिवसेना (शिंदे गट)
शीतल मंढारी - मनसे
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











