Sharad Pawar: ‘मी पुन्हा येईन..’ मोदींचा फडणवीस होईल… पवारांचा घाव वर्मी?

रोहित गोळे

16 Aug 2023 (अपडेटेड: 16 Aug 2023, 02:25 PM)

पंतप्रधान मोदींना मणिपूर हिंसाचाराविषयी बोलण्यात रस नाही. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याबाबत अधिक रस आहे. असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींविरोधात हल्ला चढवला.

sharad pawar taunts pm modi on me punha yein and criticized also devendra fadnavis

sharad pawar taunts pm modi on me punha yein and criticized also devendra fadnavis

follow google news

Sharad Pawar on Mee Punha yein: बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी यांना मणिपूर हिंसाचाराबाबत काहीही देणंघेणं नसून ते फक्त मी पुन्हा येईन.. असं म्हणत आहेत. अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीकास्त्र डागलं. (sharad pawar taunts pm modi on me punha yein and criticized also devendra fadnavis)

हे वाचलं का?

‘मी पुन्हा येईन…’वरुन पवारांनी मोदी-फडणवीसांना डिवचलं..

‘देशात अनेक ठिकाणी लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडणं हा कार्यक्रम मोदींच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने घेतलेला आहे. हा दिवसेंदिवस वाढतोय.’

‘आम्ही सगळ्यांनी मणिपूरमध्ये काय घडलं याबाबतची भूमिका संसदेत मांडली. आज ईशान्य भारत हा देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. कारण चीनची सीमा तिथे आहे. त्या भागात चीनची सीमा असताना अधिक काळजी घ्यायची गरज आहे. ईशान्य भारतात ज्या काही गोष्टी घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत त्या देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत.’

‘त्याचं उदाहरण मणिपूर द्यायचं झालं तर आज त्या ठिकाणी दोन समाजात इतकं अतंर वाढलं की, एकमेकांवर हल्ले होत आहेत, पोलीस दलावर हल्ले होत आहेत. जवळपास 90 दिवस हा संघर्ष सुरू आहे.’

हे ही वाचा >> मोदींकडून मोठी ऑफर?, Sharad Pawar यांनी अजितदादांना दाखवली जागा!

‘मात्र, त्यासंबंधी पंतप्रधानांनी अधिवेशन सुरू होण्याआधी संसदेच्या बाहेर केवळ काही मिनिटांची प्रतिक्रिया दिली. तसंच अविश्वास ठरावादरम्यान उत्तर देण्यासाठी ते जेव्हा उभे राहिले त्यावेळी फक्त या मुद्द्यावर 4-5 मिनिटं बोलले.. बाकी पावणे दोन तास इतर विषयावर भाषण करून मुख्यत: विरोधकांवर हल्ले करणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे हे समजून त्यांनी त्या ठरावाला उत्तर दिलं.’

‘मणिपूरची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.. आमची ही मागणी होती की, देशाचं एक राज्य आणि आजूबाजूच्या राज्याचे परिणाम देखील त्या ठिकाणी होणार आहेत. अशावेळी पंतप्रधानांनी ईशान्य भारतात जावं लोकांना विश्वास द्यावं… पण हे काही त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही. यापेक्षा त्यांना मध्यप्रदेशमध्ये किंवा अन्य ठिकाणी निवडणुकीच्या तयारीच्या सभा घेणं अधिक महत्त्वाचं वाटलं.’

‘मणिपूर आज जळत आहे. हल्ले होत आहेत, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. त्या स्त्रियांची धिंड काढली जाते. या सगळ्याकडे मोदी सरकारची भूमिका ही बघ्याची भूमिका आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीसंबंधी एकत्रित विचार करून एक वेगळे जनमत तयार करण्याची राष्ट्रीय आवश्यकता आहे.’

हे ही वाचा >> Mumbai train firing : बुरखाधारी महिलेला म्हणायला लावलं ‘जय माता दी’, CCTV त कैद

‘खरं म्हणजे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असताना मला अपेक्षा होती की, कालच्या 15 ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान या गोष्टीचा उल्लेख करतील. पण त्याचा उल्लेख करण्याऐवजी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलेलं दिसतंय. त्यानुसार त्यांनी सांगितलं की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’

‘देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन सांगितलं होतं.. ते पुन्हा आले पण त्या पदावर आले नाहीत त्याच्या खालच्या पदावर आले. आता हा आदर्श यांनी घेऊन आता यांनी कोणत्या पदावर यायचा विचार केलाय हे मी आज सांगू शकत नाही.’

‘पण त्यांना ईशान्य भारतातील संकट महत्त्वाचं वाटत नाही. मी पुन्हा कसा येईन यासंबंधीची चिंता त्यांना अधिक वाटते.’

‘मला आता देशाचं चित्र मोदी सरकारला अनुकूल असं दिसत नाही. आज या निवडणुकीच्या पूर्वीच यांची विल्हेवाट कशी लावायची असा विचार केलेला दिसतोय. ते चित्र उद्याच्या निवडणुकीत दिसेल त्यामुळे भले कितीही जोरात सांगितलं की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. तर पुन्हा येईन त्यांची स्थिती देवेंद्रसारखी होईल याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही.’ अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींवर हल्ला चढवला.

    follow whatsapp