‘..तर भाजपला दोष देऊन काय उपयोग? याची गरज नव्हती’, श्रीनिवास पवार रोहित अन् जय पवारांबाबत काय म्हणाले?

Shriniwas Pawar on Jay Pawar and Rohit Pawar : बारामती विधानसभेच्या 2029 च्या निवडणुकीबाबत आमदार रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात..

Rohit Pawar and Jay Pawar

Rohit Pawar and Jay Pawar

मुंबई तक

23 Apr 2026 (अपडेटेड: 23 Apr 2026, 01:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

‘..तर भाजपला दोष देऊन काय उपयोग? याची गरज नव्हती’,

point

श्रीनिवास पवार रोहित अन् जय पवारांबाबत काय म्हणाले?

Shriniwas Pawar on Jay Pawar and Rohit Pawar, बारामती  :  अजित पवारांच्या मृत्यूनंतर होत असलेल्या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.23) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, मतदान सुरु असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलंय. "बारामतीमधून 2029 मध्ये मी निवडणूक लढावी, अशी बारामतीकरांची इच्छा आहे. पण माझ्या मनात आहे की, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच पुढे काम चालू ठेवावं आणि सर्वांना मदत करावी." असं जय पवार म्हणाले आहेत. तर जय पवारांच्या या वक्तव्याला प्रत्युतर देताना रोहित पवार म्हणाले की, "2029 मध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मात्र, पवार विरुद्ध पवार हा संघर्ष लोकांना नकोय. तो भाजपला हवाय. "

हे वाचलं का?

दरम्यान, रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत श्रीनिवास पवार यांनी भाष्य केलंय. ते बारामती येथे 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा : "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

दोघांनीही या क्षणाला काही बोलण्याची गरज नव्हती : श्रीनिवास पवार 

श्रीनिवास पवार म्हणाले, जर तुम्हाला माहिती आहे की, पवार विरुद्ध पवार असा संघर्ष लोकांना नको वाटतोय. तर मग पवारांनी समजूतीने घ्यायला हरकत नाही. यामध्ये भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला जर कळत असेल की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघत आहे. तरीपण तुम्ही आता अशा प्रकारची वक्तव्य करत आहात. हे चुकीचं आहे. दोघांनीही या क्षणाला काही बोलण्याची गरज नव्हती. आज महत्त्वाचा दिवस आहे. आज आपण सर्वजण होऊन दादांसाठी हे सगळं करत आहोत. कोणीही विरोधात उभा राहिलेलं नाही. मला वाटतं आता त्या गोष्टींची गरज नव्हती. 

साहेबांचा मतदारसंघ संभाळण्याची जबाबदारी देखील रोहित पवारांना घ्यायची असेल : श्रीनिवास पवार 

पुढे बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, आमच्या कुटुंबात संवाद आहे. राजकारण म्हणून आमच्या घरात साहेबच निर्णय घ्यायची. 60 वर्ष झाले ते त्यांचे क्षेत्र आहे. आम्ही कुटुंब म्हणून एक होतो. पण आता काल देखील साहेबांना अॅडमिट करावं लागलं. ते एखाद्या वेळेस या दोघांना बोलतील. साहेबांना न विचारता या दोघांनी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे नंतर ते बोलतील. रोहित पवारांच्या डोक्यात काय आहे? हे आपल्याला माहिती नाही. तो बारामतीतून लढणार की नाही? हे काळच ठरवेल. साहेबांचा मतदारसंघ संभाळण्याची जबाबदारी देखील रोहित पवारांना घ्यायची असेल. सांगता येत नाही, म्हणून देखील रोहित पवारांचे बारामती दौरे वाढले असतील, असंही श्रीनिवास पवार यांनी नमूद केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

"2029 मध्ये बारामतीतून मी निवडणूक लढावी, अशी लोकांची इच्छा आहे..पण" ; जय पवार यांचं मोठं वक्तव्य