"2029 मध्ये बारामतीतून मी निवडणूक लढावी, अशी लोकांची इच्छा आहे..पण" ; जय पवार यांचं मोठं वक्तव्य

मुंबई तक

Baramati Rahuri By-Election 2026 Voting : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपूत्र जय पवार यांनी बारामतीच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलंय. मी 2029 मध्ये बारामतीतून निवडणूक लढावी, अशी जनतेची इच्छा असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

Jay Pawar's big statement
Jay Pawar's big statement
google news

बातम्या हायलाइट

point

2029 मध्ये बारामतीतून मी निवडणूक लढावी, अशी लोकांची इच्छा; जय पवार यांचं मोठं वक्तव्य

Baramati Rahuri By-Election 2026 Voting, Baramati : "बारामतीमधून 2029 मध्ये मी निवडणूक लढावी, अशी बारामतीकरांची इच्छा आहे. पण माझ्या मनात आहे की, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच पुढे काम चालू ठेवावं आणि सर्वांना मदत करावी.", असं वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपूत्र जय पवार यांनी केलंय. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.23) मतदान प्रक्रिया पार पडत असताना जय पवारांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे पुढील काळात बारामती विधानसभेची निवडणूक जय पवार हे लढवणार असल्याची चर्चा सुरु झालीये. 

हेही वाचा : मालेगाव बॉम्बस्फोट: CBI, NIA च्या तपासानंतरही शेवटचे चारही आरोपी निर्दोष, मग दोषी कोण?

जास्तीत जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं : जय पवार 

जय पवार म्हणाले, अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या लोकांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 20 ते 23 लोकांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. आमच्याकडे अपक्ष उमेदवारांनी पैशाची मागणी केलेली नाही. इतर त्यांच्या मागण्या होत्या. मात्र, त्यातल्या त्यात कधीकधी कोणाला आर्थिक मदत लागत असते. जास्तीत जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं. आम्हाला आशा आहे की, अजितदादांसाठी लोकं मतदान करतील. आज इथं आलोय, त्यावेळी भरपूर लोकं मतदानासाठी आलेले दिसत आहेत. इतर पोलिंग एजंट्सला विचारलं तर त्यांनीही प्रतिसाद चांगला असल्याचं म्हटलं आहे. मी गावोगावी फिरत होतो, त्यावेळी दादांसाठी चांगल्या टक्केवारीने मतदान करायचं, असा लोकांचा सूर होता. 

या निवडणुकीत लोकांनी रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून देण्याचं ठरवलं

पुढे बोलताना जय पवार म्हणाले, विरोधात कोणाही स्ट्राँग नाही, तुम्ही सगळे पत्रकार बोलत आहात, ते खरं आहे. मात्र, सर्वांनी या निवडणुकीत लोकांनी रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून देण्याचं ठरवलं आहे. सगळ्यांच्या मनात होतं की, बिनविरोध झाली असती तर दादांना श्रद्धांजली ठरली असती. दादांसारखं कोणी होणार नाही. मात्र, दादांचा मुलगा म्हणून कोणाला त्यांच्या क्वालिटी लोकांना माझ्यामध्ये दिसत असतील. दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतले आहेत. मनात अजूनही वाईट वाटतंय, दादा आपल्याला सोडून गेले आहेत. 

हे वाचलं का?