मुंबई: मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आक्षेप घेत त्याबाबत कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ज्याबाबत आज (1 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने मराठा आंदोलनाचे आयोजक आणि राज्य सरकार असे दोघांनाही खडे बोल सुनावले आहेत. एवढंच नव्हे तर उद्या (2 सप्टेंबर) 4 वाजेपर्यंत अल्टिमेटम देखील दिला आहे. मराठा आंदोलकांनी मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते अडवले असल्याचे कोर्टात सांगण्यात आले. ज्यावर कोर्टाने हा अल्टिमेटम दिला आहे.
ADVERTISEMENT
याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोर्टाने सरकारला असेही आदेश दिले आहेत की, 'महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडविण्यात यावं. आझाद मैदानात केवळ 5 हजार आंदोलकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापेक्षा अधिक लोकं जमा होता कामा नये.'
हे ही वाचा>> Maratha Reservation: 'मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे घडतं आहे', सदावर्तेंचा हायकोर्टात खळबजनक दावा
मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाने काय दिले निर्देश?
- मुंबईतील रस्ते उद्या (2 सप्टेंबर) दुपारी 4 वाजेपर्यंत मोकळे करा. हायकोर्टाचे सरकारला निर्देश
- मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना वेशीवरच अडवा असंही कोर्टाने म्हटलं आहे.
- उद्या (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता पुन्हा हायकोर्टात सुनावणी होईल.
- आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको. असंही कोर्टाने बजावलं आहे.
- मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलकांना तिथून हटवा.
- मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा.
- मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले आहेत तिथून आंदोलकांना हटवा
- सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं.
- गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको
- आम्ही संयम ठेवलाय कारण काही तरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा आहे.
- आंदोलनाविरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं.
- मुंबईकरांना विनाकारण त्रास होता कामा नये.
- मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण नको.
- लोकांना मुलभूत गरजा मिळायला हव्या, शाळ-कॉलेज आणि नोकरदारांना त्रास नको
- मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करा.
अशा स्वरूपाचे निर्देश हायकोर्टाने यावेळी दिले आहेत. ज्याचं पालन मराठा आंदोलक आणि राज्य सरकार असं दोघांनाही करावे लागणार आहेत.
हे ही वाचा>> मनसेकडून आंदोलकांना वानखेडे स्टेडियम देण्याची मागणी, नंतर राज ठाकरेंच्या टीकेवरही... काय म्हणाले बाळा नांदगांवकर?
'दादा सांगतील ते आदेश पाळा...', जरांगेंच्या वकिलांचं आवाहन
सुनावणीनंतर मनोज जरांगे यांचे वकील श्रीराम पिंगळे यांनी देखील मराठा आंदोलकांना आवाहन केलं. ते म्हणाले की, 'मराठा आंदोलकांना आवाहन करतो की, दादा सांगतील ते आदेश पाळा आणि तुम्ही 5 हजार सोडून या व्यतिरिक्त त्या मैदानात किंवा दुसरकीडे कुठल्याही ठिकाणी थांबू नये.'
सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टात काय युक्तिवाद केला?
- पोलीस लोकांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहेत.
- आझाद मैदानात तंबू बांधले जात आहे.
- जरांगे आता आमरण उपोषण करत आहेत. आमरण उपोषणाला पोलीस परवानगी देत नसतात असं महाधिवक्त्यांनी सांगितलं.
- आमरण उपोषण करणार नसल्याचं हमीपत्रं जरांगेंनी दिलं.
- हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार सांगितलं, पण नियम पाळले नाहीत.
- आझाद मैदानासह इतर बऱ्याच ठिकाणी आंदोलक आंदोलन करत होते.
- आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं.
- ध्वनीक्षेपकाचा वापर परवानगीविना करण्यात आला.
- शनिवार-रविवारचं आंदोलन विनापरवाना करण्यात आलं.
- गाड्या रोखल्या जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत.
- 5 हजार आंदोलकांना परवानगी होती पण हजारो लोक आले.
- आंदोलनाविरोधात अनेक याचिका कोर्टात दाखल झाल्या आहेत.
- गणेशोत्सव सुरू असताना पोलिसांवर अधिकचा ताण आहे.
- मुंबई पोलिसांची निम्म्याहून यंत्रणा आंदोलनाच्या बंदोबस्तात व्यस्त आहे.
असा युक्तिवाद हा महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडताना केला आहे. ज्यानंतर कोर्टाने याबाबत काही महत्त्वाचे निर्देश दिले.
ADVERTISEMENT
