"ज्या कठीण प्रसंगात मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा डोळ्यासमोर..", सुनेत्रा पवार भाषणात काय म्हणाल्या?

मुंबई तक

19 Feb 2026 (अपडेटेड: 19 Feb 2026, 10:40 AM)

Sunetra Pawar Speech : सुनेत्रा पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचं बळ आम्हा सर्वांना दे.., असं साकडं आई शिवाई देवीच्या चरणी घालते. आजच्या दिवस माझ्यासाठी वेगळा आहे. आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे… शिवभूमी हे दादांच्या विचारांचे प्रेरणास्थान होते.. आदरणीय दादांच्या मधला देण्याचा धागा अत्यंत अतूट होत. या किल्ल्याची दादांना फक्त जिव्हाळा नव्हता तर भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवत यावा, हे प्रयत्न त्यांनी केले..

Sunetra Pawar Speech

Sunetra Pawar Speech

Google CTA

बातम्या हायलाइट

point

"ज्या कठीण प्रसंगात मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.."

point

सुनेत्रा पवार शिवनेरीवरील भाषणात काय म्हणाल्या?

Sunetra Pawar Speech : "नुकतीच मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याक्षणी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा ध्यास दिला आणि संस्कार देखील दिले. तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे. ज्या विचारांवर दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव शाहू आंबेडकरांचा वारसा मी कधी सोडणार नाही हा मी तुम्हाला शब्द देते.", असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. शिवजयंतीच्या निमित्ताने त्या शिवरायांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

हे वाचलं का?

सुनेत्रा पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचं बळ आम्हा सर्वांना दे.., असं साकडं आई शिवाई देवीच्या चरणी घालते. आजच्या दिवस माझ्यासाठी वेगळा आहे. आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे… शिवभूमी हे दादांच्या विचारांचे प्रेरणास्थान होते.. आदरणीय दादांच्या मधला देण्याचा धागा अत्यंत अतूट होत. या किल्ल्याची दादांना फक्त जिव्हाळा नव्हता तर भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवत यावा, हे प्रयत्न त्यांनी केले..शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, यासाठी देखील प्रयत्न करत होते. त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला. गेल्यावर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये किल्ले शिवसेनेचा समावेश झालाय. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतेच नाही, जुन्नर तालुक्यात पर्यटनाची वाढ व्हावी, यासाठी देखील ते प्रयत्नशील होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

घराजवळ शौचास बसला होता, घरमालकाने गच्चीवरुन फेकून मारली फरशी, तरुणाचा मृत्यू; मृतदेह रस्त्यावर ठेऊन नागरिकांनी केला रास्ता रोको