राजू शेट्टींचा आणखी एक सहकारी दुरावणार? रविकांत तुपकरांनी दिला इशारा

मुंबई तक

24 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 12:14 PM)

ravikant tupkar says they will contest lok sabha election from buldhana : माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी साथ सोडल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा आणखी एक सहकारी साथ सोडणार का?

Mumbaitak
follow google news

बुलढाणा : माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी साथ सोडल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा आणखी एक सहकारी साथ सोडणार का असा सवाल विचारला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आणि राजू शेट्टी यांच्यात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. राजू शेट्टीच्या डोक्यात बुलढाणा नाव असो की नसो मात्र आमच्या डोक्यात बुलढाणा लोकसभेची (Buldhana Loksabha) जागा लढण्याचा निर्णय पक्का आहे आणि आम्ही पूर्ण ताकतीने लढणार असा इशारा तुपकर यांनी शेट्टींना दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

हे वाचलं का?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वासर्वे माजी खासदार राजू शेट्टी यांनी 5-6 मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा नुकतीच केली. यात हातकणंगले,कोल्हापूर आणि सांगली नावाचा उल्लेख केला. मात्र या जागांमध्ये बुलढाणा लोकसभेचा उल्लेख त्यांनी केला नाही.यावरुनच तुपकर यांनी शेट्टींना इशारा दिला आहे. तुपकर म्हणाले, राजू शेट्टींनी केलेल्या घोषणामध्ये बुलढाणा लोकसभेचं नाव आहे किंवा नाही हे मला माहित नाही. मात्र राजू शेट्टींच्या डोक्यात बुलढाणा नाव असो की नसो, आमच्या डोक्यात बुलढाणा लोकसभा लढण्याचा निर्णय पक्का आहे आणि आम्ही पूर्ण ताकतीने बुलढाणा लोकसभा लढणार आहे.

सदाभाऊ खोत यांनी सोडली होती साथ :

दरम्यान, यापूर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही सात वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांची साथ सोडली आहे. शेतकऱ्यांबद्दलच्या त्यांच्या निष्ठा संशयास्पद असल्याचं कारण देत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनीही शेट्टींची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपप्रणीत एनडीए आघाडीत सहभागी झाल्यानंतर पक्षाच्या कोट्यातून खोत यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. मात्र, सरकारमध्ये गेल्यानंतर ते संघटनेपासून दूर गेले. त्यातून संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. कर्जमुक्तीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी खोत यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतल्यानं हे मतभेद आणखी तीव्र झाले.

Modi Surname case : ज्यांच्या तक्रारीमुळे राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा ‘ती’ व्यक्ती आहे तरी कोण?

पाच वर्षांपूर्वीही सोडली होती साथ :

दरम्यान, रविकांत तुपकर यांनी २०१९ मध्येही राजू शेट्टी यांची साथ सोडून सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. परंतु, अवघ्या २० दिवसांमध्ये ते राजू शेट्टी यांच्या पक्षात परतले होते. त्यावेळीही ते बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात होते. स्वाभिमानी संघटनेत अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर कायम चर्चेत राहिले होते. त्यांनी बुलडाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे, तसंच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

    follow whatsapp