संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव केल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Swaroopanand Deshmukh first reaction after defeating Santosh Deshmukh wife : मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव केल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलीये. ते काय म्हणाले जाणून घेऊयात...

Swaroopanand Deshmukh first reaction after defeating Santosh Deshmukh wife

Swaroopanand Deshmukh first reaction after defeating Santosh Deshmukh wife

मुंबई तक

29 Apr 2026 (अपडेटेड: 29 Apr 2026, 11:55 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव केल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांची प्रतिक्रिया

point

"हा विजय माझ्या स्वाभिमानी गावातील मतदारांचा"

Swaroopanand Deshmukh first reaction after defeating Santosh Deshmukh wife : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या जाण्यामुळे मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूमी मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र, तसं काही झालेलं नाही. मस्साजोगच्या सरंपचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव झालाय. त्यांचे प्रतिस्पर्धी स्वरुपानंद देशमुख यांना निवडणुकीत विजय मिळवला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केलाय. दरम्यान, या विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत स्वरुपानंद देशमुख काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

स्वरुपानंद देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया 

स्वरूपानंद देशमुख यावेळी बोलताना म्हणाले, माझ्यावर कोणी काय आरोप केले, हे माहिती नाही. मात्र माझ्या गावकरी आणि माझ्या मतदार राजा माझ्यासोबत होता आणि त्यांचा माझ्यावर विश्वास होता. कोणी काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्यासोबत होतो. या अगोदरही संतोष देशमुख यांच्या लढाईमध्ये मी समोर होतो आणि यापुढेही संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईमध्ये मी समोर असेल. माझ्या स्वाभिमानी गावातील मतदारांचा, माझ्या नव तरुणांचा हा विजय आहे. येणाऱ्या काळामध्ये गावातील काम कोण करू शकतो? याचा विचार करुन विश्वास ठेवून मला गावकऱ्यांनी निवडून दिलेले आहे आणि यामुळे माझा हा  विजय झालेला आहे.

हेही वाचा : पुण्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 16 राऊंड फायर केल्याने देहुरोड परिसरात दहशतीचं वातावरण

स्वरुपानंद देशमुख यांनी किती मतांनी मिळवला विजय?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी आणि दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव केला. संतोष देशमुख यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीची मतमोजणी केज येथील तहसील कार्यालयात पार पडली. प्रशासनाने मतमोजणीसाठी 3 टेबलची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया केवळ एकाच राऊंडमध्ये पूर्ण करण्यात आली, ज्यामुळे अवघ्या काही वेळातच निकालाचे चित्र स्पष्ट झाले. मतमोजणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करताच समर्थकांनी एकच जल्लोष केला.

गावात 84 टक्के विक्रमी मतदान; मतदारांचा मोठा उत्साह

मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी काल (सोमवारी) मतदान पार पडले होते. गावातील एकूण 2080 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामुळे गावात तब्बल 84 टक्के इतके मोठे मतदान झाले होते. मतदानाची ही वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मतदारांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या पारड्यात आपले मत टाकून त्यांना गावची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 


पुण्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 16 राऊंड फायर केल्याने देहुरोड परिसरात दहशतीचं वातावरण