Tejasvi Ghosalkar on Mumbai Mahapalika Election : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि.15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक ठिकाणी ईव्हिएम मशीन सुरु होत नाहीयेत. काही ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय. दरम्यान, काही उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क देखील बजवला आहे. मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत असलेल्या भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी मतदानाच्या दिवशी प्रतिक्रिया दिलीये. त्या अतिशय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. अभिषेक घोसाळकरांची आठवण काढताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबईतील 227 वॉर्डातील उमेदवारांची संपूर्ण यादी, मतदानाला जाण्याआधी नक्की पाहून जा!
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “आज अभिषेकची खूप आठवण येत आहे. तो असताना सगळं वेगळं वाटायचं. सगळ्या गोष्टी तोच हँडल करायचा. आज त्याची खूप उणीव भासत आहे.” पुढे बोलताना त्यांनी कुटुंब आणि राजकारण याबाबत भूमिका स्पष्ट केली. “कुटुंब आणि राजकारण वेगळं आहे. आशीर्वाद माझ्यासोबत असतील, मात्र आमचे विचार वेगळे आहेत,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी सासूबाईंविषयी बोलताना त्या अधिक भावूक झाल्या. “माझ्या सासू माझ्यासाठी आईच आहेत. त्या अभिषेकला मिस करत आहेत आणि मी देखील त्याला खूप मिस करत आहे,” असे त्या म्हणाल्या. आपल्या कामावर आणि जनतेवर विश्वास व्यक्त करताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “अभिषेक आणि मी केलेल्या कामासाठी लोक नक्कीच मतदान करतील. माझा विजय निश्चित आहे.”
मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 2 हा शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या वॉर्डातून भाजपकडून तेजस्वी घोसाळकर तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून धनश्री कोलगे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून घराघरात जाऊन प्रचार करण्यात आला असून विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि भविष्यातील नियोजन यावर भर दिला जात आहे. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये पारंपरिक मतदारांसोबतच तरुण मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. एकूणच वॉर्ड क्रमांक 2 मध्ये ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज (दि.15) मतदान प्रक्रिया सुरु असताना तेजस्वी घोसाळकर भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबईकरांनो तुम्हाला 'इथे' करायचंय मतदान, पाहा मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी
ADVERTISEMENT










