मुंबईतील 227 वॉर्डातील उमेदवारांची संपूर्ण यादी, मतदानाला जाण्याआधी नक्की पाहून जा!

मुंबई तक

227 wards list of candidates: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या (१५ जानेवारी २०२६) मतदान पार पडणार आहे. त्याआधी तुमच्या वॉर्डात नेमका कोण आणि किती उमेदवार आहेत याची संपूर्ण यादी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

ADVERTISEMENT

bmc election 2026 complete list of candidates for all 227 wards in mumbai be sure to check it before you go to vote
227 wards list of candidates
social share
google news

मुंबई: मुंबईतील मतदारांसाठी उद्या (15 जानेवारी 2026) ऐतिहासिक दिवस आहे. तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या 227 प्रभागांसाठी मतदान होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीत हजारो उमेदवार रिंगणात आहेत. यंदाची लढत ही अत्यंत रंगतदार आणि बहुकोनी ठरली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या जागा वाटप केले असून, महायुती (भाजप + शिंदे गट शिवसेना) आणि महाविकास आघाडी ( शिवसेना ठाकरे+ मनसे+ राष्ट्रवादी - शरद पवार) यांच्यात मुख्य रस्सीखेच आहे. शिवाय, ठाकरे बंधूंची एकजूट (उद्धव आणि राज ठाकरे), MNS, NCP, VBA यांसारख्या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत.

भाजपने १३७ जागांवर उमेदवार दिले आहेत तर शिंदे गट शिवसेना ९० जागांवर लढत आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे सर्वाधिक जागा लढवत आहेत. तर मनसे 50 ते 60 जागांवर निवडणूक लढवत आहे.

मुंबईतील मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. राज्य सरकारने उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मुंबईकर मतदान करू शकतील.

मात्र, मतदानाला जाण्याआधी तुमच्या प्रभागात नेमके कोण आणि किती उमेदवार आहेत याची संपूर्ण यादीच आम्ही आपल्यासाठी आणली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp