Telangana Exit Poll 2023: तेलंगणचा Poll of Polls, काँग्रेस ठरणार जायंट किलर?

रोहित गोळे

• 04:56 PM • 30 Nov 2023

Telangana Assembly Election Poll Of Polls: तेलंगणा हे राज्यात बदल होणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तेलंगणाच्या निर्मितीपासून हे राज्य बीआरएस पक्षाच्या हातात आहे. मात्र, यंदा येथे बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

telangana exit poll 2023 poll of polls of telangana congress will be a giant killer

telangana exit poll 2023 poll of polls of telangana congress will be a giant killer

follow google news

Telangana Assembly Election Poll Of Polls Exit Poll 2023: तेलंगणा हे राज्य दक्षिण भारतातील महत्त्वाचं असं राज्या आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत भाजपला हे राज्य गमवावं लागलं. तिथे काँग्रेसने अनपेक्षितरित्या असा विजय मिळवला. तर असाच काही आश्चर्याचा धक्का काँग्रेस पुन्हा एकदा देण्याच्या तयारीत आहे. एकीकडे भाजप दक्षिण भारतात शिरकाव करता यावा यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र, दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करत चालला असल्याचं दिसत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणामध्ये विजय मिळविल्यास काँग्रेसचं मनोबल हे अधिक उंचावू शकतं. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकींमध्ये तेलंगणामध्ये जनतेने कोणाला बहुमत दिलंय हे आता आपण पोल ऑफ पोल्सच्या माध्यमातून पाहूया.

हे वाचलं का?

तेलंगणा निवडणुकीचा इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल उद्या होणार जाहीर

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल जाहीर करत असतानाच तेलंगणामध्ये मतदान हे सुरू होतं. त्यामुळे तेलंगाणाचा एक्झिट पोल हा उद्या (1 डिसेंबर) जाहीर केला जाणार आहे.

पाहा काय आहे तेलंगणाचा Poll of Polls

इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?

  • टाइम्स नाऊ सीएनएक्सच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 7 जागा मिळतील. तर काँग्रेसला 37 जागा आणि बीआरएसला 66 जागा मिळतील.

  • न्यूज एक्स एनटीएच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 6 जागा मिळतील. तर काँग्रेसला 46 जागा आणि बीआरएसला 57 जागा मिळतील.
तेलंगणाचा Poll of Polls

 

  • ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 5 जागा मिळतील. तर काँग्रेसला 53 जागा आणि बीआरएसला 54 जागा मिळतील.

  • न्यूज नेशनच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 3 जागा मिळतील. तर काँग्रेसला 53 जागा आणि बीआरएसला 55 जागा मिळतील.

    follow whatsapp