‘शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई तोडण्याचा डाव’,ठाकरे गटाची भाजपवर टीका

मुंबई तक

01 May 2023 (अपडेटेड: 01 May 2023, 03:13 AM)

शिवसेनेची मुंबईवरील पकड तोडायची, मग मराठी माणूस आपोआप नष्ट होईल. म्हणून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई तोडण्याचा डाव सुरु आहे, मुंबईचा घास गिळायचा हे एकंदरीत षड्यंत्र असल्याची टीका ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून (Samana Editorial) भाजपवर करण्यात आली आहे. तसेच आजच्या महाराष्ट्र दिनी तमाम मराठी बाधवांनी मुंबईसाठी लढण्याचा निर्धार अधिक पक्का करावा असे आवाहन देखील यावेळी […]

thackeray's criticism on bjp

thackeray's criticism on bjp

follow google news

शिवसेनेची मुंबईवरील पकड तोडायची, मग मराठी माणूस आपोआप नष्ट होईल. म्हणून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई तोडण्याचा डाव सुरु आहे, मुंबईचा घास गिळायचा हे एकंदरीत षड्यंत्र असल्याची टीका ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून (Samana Editorial) भाजपवर करण्यात आली आहे. तसेच आजच्या महाराष्ट्र दिनी तमाम मराठी बाधवांनी मुंबईसाठी लढण्याचा निर्धार अधिक पक्का करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.(thackeray’s criticism on bjp is plot to break Mumbai by stabbing Shiv Sena in the back)

हे वाचलं का?

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईत आले की मुंबईकरांच्या काळजात चर्र होते. मुंबई तोडण्यासाठी आलेत की येत आहेत. या भयाने तो व्याकूळ होतो, पण त्यातूनच मर्द मावळा उसळतो.महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी लढावेच लागेल. 105 हूतात्मे झाले, उद्या त्यात भर पडली तरी चालेल, पण शिवरायांचा महाराष्ट्र आणि मुंबई एक राहण्यासाठी नवी लढाई लढावीच लागले,असे आवाहन सामनातून करण्यात आले आहे. ज्या शिवप्रभूंच्या कृपेने महाराष्ट्र राज्य जन्माला येऊन 63 वर्षे झाली, त्या महाराष्ट्राची अवस्था दिल्लीच्या वाटेवरच्या पायपुसण्यासारखी झाली आहे.

हे ही वाचा : बाजार समिती निवडणुकीत कुणी कुणाचा पाडला ‘भाव’?

मुख्यमंत्री भाजपचे मिंधे

कर्नाटकाने घास घेतलेला बेळगाव, कारवारसह 20 लाख मराठी भाषिकांचा भाग त्यांच्या जबड्यात आहे. तेथे महाराष्ट्र एकिकरण समिती अभिमन्यूप्रमाणे चक्रव्युहात घूसून कानडी सत्ताधाऱ्यांशी लढत आहे.पण हे चक्रव्युह तोडून मराठी जणांना न्याय द्यावा असे कोणालाही वाटत नाही, अशी टीका देखील सामनातून भाजपावर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी बेळगावसह सीमा भागात एकीकरण समीतीच्या प्रचारात सहभागी व्हायला हवे,पण तसे घडणार नाही, कारण ते भाजपचे मिंधे असल्याची टीका केली आहे. तसेच भाजप महाराष्ट्र अस्मितेच्या, मराठी न्याय हक्कांच्या कोणत्याही लढ्यात कधीच दिसला नाही.त्यामुळे मुंबई तोडली काय आणि बेळगावातील मराठी जनांवर अन्यायाचा वरवंटा फिरवला काय, त्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही,अशी टीका देखील भाजपवर करण्यात आली.

आज मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे व महाराष्ट्राला कंगाल करण्याचे कारस्थान सुरू आहे. मुंबईतील कार्यालये, महाराष्ट्रातील उद्योगांवर दरोडे टाकून गुजरातेत नेले,यावर मुख्यमंत्री डोळ्यांवर दाढी ओढून बसल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

    follow whatsapp