'अरे ये तो सिर्फ ट्रेलर है...', दाढी खाजवत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना खिजवलं! 'तो' पराभव अन्... नेमकं काय घडलं?

नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा भाजपच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अपक्ष गोकुळ गीतेकडून पराभव झाल्यानंतर शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरेंनी थेट शिंदेंची मिमिक्री करत त्यांना डिवचलं आहे.

this is just trailer aaditya thackeray taunted eknath shinde while scratching his beard taking a sarcastic dig at defeat in nashik legislative council election

आदित्य ठाकरेंनी शिंदेंना खिजवलं

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 01:55 PM)

follow google news

मुंबई: नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गीते यांनी अत्यंत अनपेक्षितरित्या पराभव केला. ज्या पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी थेट आरोप केला की, महायुतीतील नेत्यांनी माझा विश्वासघात केला. दुसरीकडे याच घडामोडीवर आज (22 जून) शिवसेना UBT आमदार आदित्य ठाकरे यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट दाढी खाजवत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना खिजवलं. यावेळी आदित्य ठाकरे असंही म्हणाले की, 'ये तो सिर्फ ट्रेलर है..' आता आदित्य ठाकरे यांनी नेमकं असं का म्हटलं.. किंवा अशी कृती काय घडली हे आपण जाणून घेऊया. मात्र, त्याआधी विधानसभेत जाण्याआधी आदित्य ठाकरे पत्रकारांशी नेमकं काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया.

हे वाचलं का?

ठाकरेंनी दाढी खाजवत शिंदेंना खिजवलं!

प्रश्न: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय.. काय सांगाल? 

आदित्य ठाकरे: या प्रश्नानंतर आदित्य ठाकरेंना आपलं हसू आवरलं नाही.. यावेळी एकनाथ शिंदेंना डिवचत आदित्य ठाकरे असंही म्हणाले की, हसता-हसता बोलता येत नाहीए. 

प्रश्न: भाजपने शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे का? 

आदित्य ठाकरे: यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ज्यावेळी त्यांनी थेट दाढी खाजवत.. 'अरे ये सिर्फ ट्रेलर है...' असं म्हणत एकनाथ शिंदेंना आणखी खिजवण्याचा प्रयत्न केला.

आदित्य ठाकरेंनी अशा प्रकारे शिंदेंना का खिजवलं?

नुकतंच शिवसेनेकडून (शिंदे गट) ऑपरेशन टायगर घडविण्यात आलं. ज्यामध्ये त्यांनी शिवसेना UBT पक्षाचे 6 खासदार फोडले. हे सहाही खासदार मशाल या चिन्हावर निवडून आले होते. मात्र, 2/3 तृतीयांश या निकषाचे आधारे ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षाकडे आपली वाटचाल सुरू केली. याच सगळ्या घडामोडीनंतर दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. ज्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना 'ऑपरेशन टायगर'वरून डिवचलं होतं.

हे ही वाचा>> नाशिक विधान परिषदः स्वतःची कोणतीही ताकद नसताना अपक्ष गीतेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा गेम ओव्हर, कोण आहे हा जायंट किलर?

पाहा त्यावेळी एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते.. 

'बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. एकनाथ शिंदे काय बोलणार, व्यासपीठावर कोण-कोण बोलणार.. काय होणार? अरे आज ये टायगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय.. काल-परवापासून कुछ कुत्ते रोज भौंक रहे है.. पण मी तुम्हाला सांगतो.. कुत्ते झुंड मैं आके भौंकते है.. शेर अकेला आता है. कुत्ते भौंकते रहते है.. टायगर शिकार करता रहता हैं. ही शिवसेना आहे. हीच शिवसेना आज महाराष्ट्रात आपण पाहतोय.. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय.'

'ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! आगे आगे देखो होता है क्या.. आपली शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्म झाला. महाराष्ट्राची अस्मिता म्हणून शिवसेना उभी राहिली. हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना..' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना त्यावेळी डिवचलं होतं 

दरम्यान, आज जेव्हा विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला. जो भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गोकुळ गीते यांनी केला. तेही अपक्ष म्हणून.. याच पराभवनंतर नरेंद्र दराडे नेमकं काय म्हणाले ते पाहा..

हे ही वाचा>> ऑपरेशन टायगरनंतर.. आणखी मोठा भूकंप घडवणार शिंदे? स्टेजवरून स्वत:च दिली मोठी हिंट

शिवसेना (शिंदे गट) पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे म्हणाले, 'त्यांनी माझा घात केला...' 

'महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला. आतून त्यांना सपोर्ट केला. मी आशेवर राहिल्यामुळे कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात केला. अंधारात ठेऊन मला पाडलं.'

'शिवसेनेचे मंत्री माझ्यासोबत होते. पण बाकी सगळ्यांनी विश्वासघात केला.. गिरीश महाजनांनीच गोकुळ गीतेला ताकद दिली.' असं म्हणत दराडेंनी थेट भाजपवर विश्वासघाताचा आरोप केला. 

आता याच सगळ्या घडामोडीनंतर जेव्हा आदित्य ठाकरेंना जेव्हा नाशिकबाबत सवाल करण्यात आला तेव्हा मात्र, त्यांनी उपरोधिकपणे शिंदेंना टोला लगावला आहे.