Maharashtra politics : अजित पवारांसोबत केलेली युती अधर्म नव्हे तर कुटनीती असल्याचे विधान उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या याच विधानावरून शिवसेनेने (UBT) एक काही प्रश्न विचारले आहेत. ‘बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी… दोन वांझ भाषणे!’, या अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांबरोबरच शिंदेंवरही बाण डागले आहेत.
ADVERTISEMENT
शिवसेनेने म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी महाराष्ट्रात वजन होते. त्यांचे बोलणे काही प्रमाणात गांभीर्याने घेतले जात होते. त्यांचे चित्त तेव्हा स्थिर होते. मनही शांत होते, पण 2019 सालापासून त्यांची मनःशांती, संयम वगैरे साफ ढळला आहे.”
‘फडणवीसांनी सत्य-नीतिमत्तेची कास सोडली’
“फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, ‘सध्या राष्ट्रवादी काँग्रेसशी म्हणजे अजित पवार गटाशी झालेली युती ही कूटनीती आहे, अधर्म नव्हे.’ भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती राजकारणात वापरावी लागते, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांना झाले आहे तरी काय? मुख्यमंत्री मिंधे यांच्या संगतीत आल्यापासून त्यांनी सत्य व नीतिमत्तेची कास सोडली आहे. त्यांना जुने काही आठवत नाही असेच एकंदरीत दिसत आहे”, असा चिमटा अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांना काढला आहे.
वाचा >> 8 जणांकडून सामूहिक बलात्कार: महिलेचा यू-टर्न, पोलिसांनी लावला डोक्याला हात, काय घडलं?
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याचे फडणवीसांनी म्हटले होते. त्यावर बोट ठेवत शिवसेनेने (UBT) म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मिंध्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केले व सांगितले, ‘राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झालो हे आपले बेरजेचे राजकारण आहे.’ शिंदे-फडणवीस या जोडीचे डोके ठिकाणावर नाही व दोघांना ठाण्यातल्या मानसोपचार इस्पितळातील उपचाराची गरज आहे.”
‘देवेंद्र फडणवीस दुतोंडी’, अग्रलेखात नेमकं काय?
“फडणवीस हे अलीकडे वारंवार दुतोंडीपणा करीत आहेत. राजकारणात कोणताच पक्ष हा कायमचा अस्पृश्य नसतो असे म्हणतात, पण ‘एकवेळ मी अविवाहित राहीन, पण राष्ट्रवादीशी कदापि युती करणार नाही,’ हा ‘ठेका’ फडणवीस यांनी अलीकडेच धरला होता. आज त्याच राष्ट्रवादीसोबत त्यांनी ‘फेर’ धरला आहे. तेही ठीक आहे, पण त्यांनी कूटनीती म्हणून राष्ट्रवादीशी युती केली व त्यासाठी भगवान श्रीकृष्णाची साक्ष काढली, हे अतिच झाले. मग हीच कूटनीती 2019 साली शिवसेनेने केली तेव्हा आजचे हे दुतोंडी साप का जहर ओकत होते?”, असा सवाल ठाकरेंच्या सेनेनं केला आहे.
वाचा >> ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
“तुम्ही करता ती कूटनीती व दुसऱ्यांनी केली की ती अनीती, हे कसले धोरण? अजित पवार, भुजबळ, हसन मुश्रीफ वगैरे लोकांना चक्की पिसायला लावण्याची भाषा तुम्हीच केली. मग आता श्रीकृष्णाने तुमच्या हाती असे कोणते सुदर्शन चक्र दिले, की त्यांचे सर्व गुन्हे माफ करून ‘धर्म’ म्हणून तुम्ही त्यांना सत्तेत सहभागी केले? श्रीकृष्णाने कौरवांना राज्य मिळू नये यासाठी कूटनीती आखली. देवेंद्र वगैरेंनी महाराष्ट्रात कौरवांचेच राज्य आणले व त्यास ते कूटनीती म्हणत आहेत”, असं टीकास्त्र ठाकरेंच्या सेनेने फडणवीसांवर डागलं आहे.
भुजबळ, शिंदे, अजित पवार…
ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आहे. “शिंदे, भुजबळ, अजित पवार वगैरे लोकांना कोणतीही तात्त्विक विचारप्रणाली नाही. आपले गुन्हे धुण्यासाठी, आर्थिक साम्राज्य टिकविण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात राहायचे हा काही मौलिक विचार होत नाही. ती सत्तेपुढे शरणागती ठरते. पण ही शरणागती भुजबळ, शिंदे, पवारांनी पत्करली असे म्हणण्यापेक्षा संघाच्या शिलेदारांनी स्वीकारली. महाराष्ट्रात त्यांनी आजपर्यंत जे कमावले ते सर्व कवडीमोल ठरले”, अशी टीका अग्रलेखातून केली आहे.
वाचा >> ‘शरद पवारांनी हात जोडले तरी…’, अजित पवारांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरातांच मोठं विधान
“फडणवीसांनी ‘धर्मवीर’ अमितभाई शहांचा हवाला देऊन कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘ते मला म्हणाले, देवेंद्र, राजकारणात 10 वेळा अपमान सहन कर, पण बेइमानी खपवून घेऊ नको.’ मुळात देशात गेल्या 8-9 वर्षांत ‘इमान’ नावाची चीज गुंजभर तरी उरली आहे काय? इमानाचे पानिपत दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत रोजच चालू आहे”, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“मुख्यमंत्री शिंदेही आपल्या मिंध्या कार्यकर्त्यांना म्हणाले, राष्ट्रवादीचे सोबत येणे हे बेरजेचे राजकारण आहे. माणसाला गजकर्ण झाले की अशा बेरजा सुचतात. ‘थुंकलेले चाटणे’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. बेरजेचे राजकारण वगैरे वल्गना करणाऱ्यांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT











