Tejas Thackeray health Update : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांना मुंबईतील Sir H.N. Reliance Foundation Hospital येथे दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांची तब्बेत कशामुळे बिघडलीये? याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : अॅडिशनल प्रोफेसरने MD निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, तात्काळ निलंबनाचे आदेश...
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यानंतर त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे स्वतः आज सकाळी (दि.15) रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली. कुटुंबीय तसेच पक्षातील काही पदाधिकारीही रुग्णालयात भेट देत असल्याची माहिती आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
तेजस ठाकरे हे सहसा राजकारणापासून दूर राहून पर्यावरण आणि वन्यजीव विषयांवर कार्यरत असतात. मध्यंतरी ते राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, अद्याप त्यांनी राजकारणापासून दूर राहाणे पसंत केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अॅडिशनल प्रोफेसरने MD निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, तात्काळ निलंबनाचे आदेश...
ADVERTISEMENT











