उद्धव ठाकरेंनी नाशिक सोडून मालेगावच का निवडलं? काय आहे राजकीय रणनीती?

मुंबई तक

26 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 01:02 PM)

शिवसेना आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार असून ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे.

Mumbaitak
follow google news

Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray rally :

हे वाचलं का?

–  प्रविण ठाकरे

नाशिक : कोकणमधील खेडनंतर आता शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (रविवारी) नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होणार आहे. शिवसेना आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार असून ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. (Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray rally in malegaon, nashik)

पण ठाकरे गटाने ही सभा मालेगावमध्ये का नियोजित केली?

एकेकाळी उत्तर महाराष्ट्र शिवसेनेचा गड होता, नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे, माजी महापौर अजय बोरस्ते, तर नाशिक ग्रामीणमध्ये निफाड, नांदगाव, सिन्नर, मालेगाव बाह्य असे आमदार होते. पण फूट पडल्यानंतर नाशिक उद्धव ठाकरेंच्यामागे उभे होते, पण सर्वात शेवटी खिंडार हे नाशिकला पडले , एक आमदार, एक मंत्री, आणि खासदार आता शिंदेंच्या बाजूने आहेत, जळगावचे गुलाबराव पाटील तर धुळे येथील शहर कार्यकारणीही थेट शिंदेंसोबत गेली.

युतीच्या जागा वाटपावरून सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेना नेत्याला सुनावलं!

आजचे सभास्थळ हे दादा भुसे यांच्या मतदार संघ आहे, तर अवघ्या काही अंतरावर दादा भुसे यांचे घर, शेजारी सुहास कांदे यांचा मतदार संघ आणि एक बाजूला धुळे आहे. त्यामुळे आठ ते दहा विधानसभा मतदार संघ, नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या सभेत सहभागी होतील. याच भागात ठाकरे गटाचे कोणतेही प्रभावी नेते नाहीत. ज्यामुळे या भागात कार्यकर्ते आणि नेते तयार करत मतदारसंघ मजबूत करण्यासाठी आजची सभा महत्वाची आहे. मराठवाडा, मुंबई आणि कोकण पाहता ठाकरे गट उत्तर महाराष्ट्रात अत्यंत कमकुवत झाला आहे.

हिरे बंधू देणार ठाकरे गटाला ताकद?

ठाकरे गट कुमकवत झाला असतानाच अद्वैय हिरे यांनी भाजपला काडीमोड देत ठाकरे गटात प्रवेश केला. हिरे यांचा राजकीय वारसा असला तरी ते मालेगाव मध्ये घट्ट पाय रोवू शकलेले नाहीत. ते भुसेंचे कट्टर विरोधक आहेत. आज, मालेगाव हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. ज्या पक्षात भुसे त्याविरोधात अद्वैय हिरे हे समीकरण ठरलेले आहे. अद्वैय हिरे आधी राष्ट्रवादीमध्ये होते, त्यावेळी मविआ आली आणि हिरे यांनी भाजपची वाट धरली. आता भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र आल्याने अद्वैय हिरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता ते ठाकरे गटाला ताकद देणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर अद्वैय हिरे हेच या भागातून पुढील आमदार असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Mohammed Faizal: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या ‘खासदारकी’चा सुप्रीम कोर्ट करणार फैसला

उद्धव ठाकरे आजच्या सभेत कोणत्या मुद्द्यांवर बोलणार?

आजच्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नेमके कोणावर निशाणा साधतात की, मालेगावमध्ये न होणाऱ्या विकासाबद्दल बोलत भुसेंना टार्गेट करणार? की राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याने उद्धव ठाकरे या सभेच्या माध्यमातून काय मत व्यक्त करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

खरंतर मालेगावमध्ये गेल्या काही वर्षात फारसा विकास झालेला नाही. येथील यंत्रमाग आणि हातमाग कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. या शहरात वाढती अतिक्रमणे आणि सगळ्यत महत्त्वाचे म्हणजे येथील मुस्लिम समाजाबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, मालेगावमध्ये उर्दूत लागलेल्या पोस्टरवर विरोधकांनी टीका केली आहे, उद्धव हिंदुत्वाच्या विषयावर काय बोलणार हे ही महत्वाचे मुद्दे ठरणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेमध्ये एलईडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. त्यामुळे आज ‘लाव रे तो व्हिडिओ’चा प्रयोग होणार का याचीही उत्सुकता सर्वांना आहे.

    follow whatsapp