Nirmala Sitharaman : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! अर्थमंत्र्यांनी GST मध्ये केली मोठी कपात..काय काय होणार स्वस्त? जाणून घ्या

Nirmala Sitaraman On  GST : ची काउन्सिलची 56 वी बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक प्रस्तावांबाबत चर्चा झाली.

Nirmala Sitharaman On GST

Nirmala Sitharaman On GST

मुंबई तक

• 10:49 PM • 03 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं GST बाबत मोठं विधान

point

काय काय होणार स्वस्त?

point

जाणून घ्या सविस्तर माहिती

Nirmala Sitharaman On  GST : ची काउन्सिलची 56 वी बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक प्रस्तावांबाबत चर्चा झाली. सीतारमण यांनी स्पष्ट म्हटलं की, आता फक्त दोनच GST स्लॅब असणार आहेत. जे 5 % आणि 18 % असणार आहेत. म्हणजेच आता 12  आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब संपवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

यामध्ये समाविष्ट असलेल्या अनेक गोष्टी मंजूर करण्यात आलेल्या फक्त दोन टॅक्स स्लॅबमध्ये असणार आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत म्हटलं की, आमचा फोकस सामान्य माणसांवर आहे. शेतकऱ्यांपासून कामगारांचा विचार करून स्लॅब कमी करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं. 

काय काय होणार स्वस्त?

यूएचटी दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा आता झिरो जीएसटीच्या स्लॅबमध्ये टाकण्यात आला आहे. या वस्तूंवर आता जीएसटी लागणार नाही. याशिवाय सामान्य माणसांना दिलासा देत सीतारमण यांनी म्हटलं, शॅम्पू, साबण, तेल, तसच घरात रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तुंवर म्हणजेच मीठ, पास्ता, कॉफी, न्यूडल्सवर आता 5 टक्के जीएसटी लागणार आहे.

हे ही वाचा >> प्रेग्नंट GF ची केली हत्या..पती निघाला सीरिएल KILLER! 'त्या' 4 जणांचाही केला होता खून..सर्वात भयंकर घटनेमुळं महाराष्ट्र हादरला

याशिवाय कार,बाईक, सीमेंटवर आता 28 टक्क्यांऐवजी 18 टक्के टॅक्स लागू होणार आहे. टीव्हीवर 18 टक्क्यांवरून 18 टक्के जीएसटी झालं. तर 33  जीवनरक्षक औषधांना जीएसटीमधून  बाहेर केलं आहे. यामध्ये कर्करोगाच्या तीन औषधांचाही समावेश आहे. 22 सप्टेंबर पासून अनेक गोष्टी स्वस्त होणार असल्याचंही सीतारमण यांनी स्पष्ट केलं. 

हे ही वाचा >> "उडी मार..." पतीने केलं प्रवृत्त अन् पत्नीने घराच्या छतावरून मारली उडी! जखमी झाल्यावर सुद्धा...

    follow whatsapp