IPL 2021 मुंबईबाहेर?? कोरोनामुळे BCCI पर्यायी जागांच्या शोधात

मुंबई तक

• 02:35 AM • 27 Feb 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव काही दिवसांपूर्वी चेन्नईत पार पडला. आयपीएल २०२० चं आयोजन युएईत केल्यानंतर बीसीसीआय नवीन वर्षात स्पर्धेचं आयोजन भारतात करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय.पाटील आणि रिलायन्स स्टेडीयमवर लिग स्टेजचे सामने आयोजित करण्याचं ठरवलं होतं. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता बीसीसीआय आयपीएलसाठी […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव काही दिवसांपूर्वी चेन्नईत पार पडला. आयपीएल २०२० चं आयोजन युएईत केल्यानंतर बीसीसीआय नवीन वर्षात स्पर्धेचं आयोजन भारतात करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय.पाटील आणि रिलायन्स स्टेडीयमवर लिग स्टेजचे सामने आयोजित करण्याचं ठरवलं होतं. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता बीसीसीआय आयपीएलसाठी पर्यायी जागांचा विचार करत असल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय मुंबईव्यतिरीक्त कोलकाता, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद अशा चार ठिकाणी लिग स्टेजचे सामने आयोजित करता येतील का याची चाचपणी करत आहे. Sports Today ने याबद्दलची माहिती दिली आहे. नॉकआऊट आणि फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या अहमदाबादमध्ये आहे. अखेरची टेस्ट मॅच खेळवल्यानंतर याच मैदानावर भारतीय संघ ५ टी-२० सामने खेळणार आहे. २३ ते २८ मार्च या दरम्यान भारतीय संघ पुण्यात वन-डे सिरीज खेळणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे सामने हलवण्याची परिस्थिती असल्यास बीसीसीआय आतापासून पर्यायी जागेच्या शोधात आहे.

    follow whatsapp