महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजामध्ये वाद शिगेला? नवीन व्हिडिओ आला समोर

चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजामध्ये वाद झाल्याची मैदानावर घटना घडली होती. या संबंधित फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले होते. त्यानंतर आता आणखीण एक व्हिडिओ समोर आला आहे.

controversy-between-mahendra-singh-dhoni-and-ravindra-jadeja-new video-viral

controversy-between-mahendra-singh-dhoni-and-ravindra-jadeja-new video-viral

मुंबई तक

• 04:56 PM • 24 May 2023

follow google news

Mahendra singh dhoni Ravindra jadeja Controversy : आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने धडक मारली आहे. आता त्यांच्याशी फायनल सामन्यात नेमका कोणता संघ भिडतो याकडे फॅन्सचे लागले आहेत.तत्पुर्वी चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजामध्ये वाद झाल्याची मैदानावर घटना घडली होती. या संबंधित फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले होते. त्यानंतर आता आणखीण एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत खरंच महेंद्र सिंह धोनी आणि जडेजामध्ये वाद झाला आहे का? याचे स्पष्टीकरण मिळतेय. (controversy between mahendra singh dhoni and ravindra jadeja new video viral)

हे वाचलं का?

नेमका काय वाद झाला?

दिल्लीतील अरूण जेटली स्टेडिअम चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटलमध्ये साखळी फेरीतला 67 वा सामना खेळवला गेला. हा सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकून प्लेऑफ मधलं स्थान पक्क केलं होतं. या सामन्यात रविंद्र जड़ेजाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. रविंद्र जडेजाने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 50 धावांची लुट केली होती. या त्याच्या कामगिरीनंतर धोनी आणि जडेजामध्ये मैदानात वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते.मात्र याबाबतचे ठोस पुरावे समोर आले नव्हते.

हे ही वाचा : IPL 2023 : आरसीबी आयपीएलमधून बाहेर… विराट कोहलीने अखेर सोडलं मौन

रविंद्र जडेजाचे ट्विट

या सर्व घटनेनंतर रविंद्र जडेजाने त्याच्या ट्विटवर अकाऊंटवर ट्विट केले होते. या ट्विटमुळे धोनी आणि जडेजामध्ये वाद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला होता. कर्म हे परत फिरून येते, अगदी आज नाही तर उद्या, पण इतकं नक्की कर्म परत येते, अशा ओळी लिहलेला एक फोटो रविंद्र जडेजाने ट्विट केला होता. या ट्विटवर जडेजाची बायको रिवाबा जडेजाने ‘तुम्ही तुमचा मार्ग निवडायला हवा’ असा सल्ला तिने दिला होता.

नवीन व्हिडिओत काय?

नवीन व्हिडिओ हा मैदानातला आहे. या व्हिडिओत एक ज्येष्ठ वक्ती रविंद्र जडेजाला समजावताना दिसत आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसुन चेन्नईचे सीईओ कासी सर आहेत. या दरम्यान रविंद्र जडेजाचा चेहरा पुर्णत उतरलेला होता. धोनीसोबत वाद झाल्यानंतर कासी सरांनी रविंद्र जडेजाला मैदानात समजावले होते. त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत धोनीच आणि रविंद्र जडेजामध्ये खरचं वाद झाला आहे की स्पष्ट तर होत नाही.मात्र धोनी आणि जडेजामध्ये बिनसलं नाही आहे, हे नाकारताही येणार नाही.

हे ही वाचा : IPL Final 2023: IPL फायनलमध्ये दोन भाऊ आमनेसामने? असा घडू शकतो इतिहास

    follow whatsapp