IPL 2023 : आरसीबी आयपीएलमधून बाहेर... विराट कोहलीने अखेर सोडलं मौन - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / IPL 2023 : आरसीबी आयपीएलमधून बाहेर… विराट कोहलीने अखेर सोडलं मौन
बातम्या स्पोर्ट्स

IPL 2023 : आरसीबी आयपीएलमधून बाहेर… विराट कोहलीने अखेर सोडलं मौन

RCB out from ipl 2023 virat kohli shares hearfelt post

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बाहेर पडला. अटीतटीच्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंसह चाहत्यांमध्ये काहीसं निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं. संघाच्या पराभवानंतर माजी कर्णधार विराट कोहलीनेही बोलणं टाळलं होतं. अखेर कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. बंगळुरूचा संघ आयपीएलचा सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता आणि यावेळी हा संघ विजेतेपदावर कब्जा करू शकेल, असे मानले जात होते. पण तसे होऊ शकले नाही आणि आरसीबीच्या चाहत्यांचे स्वप्न भंगले. कोहली अँड कंपनीसाठी आतापर्यंत 16 हंगाम झाले आहेत, यात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

गुजरात टायटन्स संघाने अंतिम साखळी सामन्यात बंगळुरूचा पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. यावर विराटने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पराभवानंतर विराटने आरसीबीच्या संघाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

हेही वाचा >> Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?

विराट कोहलीने 23 मे रोजी शेअर केलेल्या आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, या हंगामात असे काही क्षण होते जे कधीच विसरता येणार नाहीत, परंतु आम्ही आमच्या ध्येयापूर्वी थोडे चुकलो. निराश नक्कीच झालो आहोत परंतु आपली उंच ठेवली पाहिजे.

आरसीबीच्या सर्व निष्ठावंत समर्थकांचा मी ऋणी आहे. मी माझा संघ, प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानू इच्छितो. पुढच्या वेळी आणखी मजबूतीने येण्याचे आमचे ध्येय आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

हेही वाचा >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

अखेरच्या सामन्यात काय घडलं होतं?

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. संघाकडून विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 1978 धावा केल्या. मात्र, शुभमन गिलनेही आपले शतक पूर्ण केल्यामुळे कोहलीच्या शतकावर पाणी फेरले गेले. गिलने 52 चेंडूत 104 धावा ठोकल्या आणि आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायमच्या संपल्या.

हा हंगाम कोहलीसाठी राहिला खास

आरसीबीचा पराभव होताच मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. संघाने अंतिम साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. मात्र, आरसीबीच्या पराभवानंतरही विराट कोहलीसाठी हा मोसम चांगलाच ठरला. IPL 2023 मध्ये विराटने अनेक विक्रम मोडले. या कोहलीने 14 सामन्यात 639 धावा केल्या. या सत्रात त्याची सरासरी 53.25 इतकी होती.

वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo Sahid Kapoor पत्नीच्या ‘या’ सवयीने हैराण! लग्नाच्या 8 वर्षांनंतर सांगितलं सत्य मुंबईत या गँगस्टरची होती दहशत, नाव ऐकलं तरी फुटायचा घाम अनन्या, निसा, सुहानासोबत दिसणारा ‘हा’ तरूण भेटला राहुल गांधींना! Photo Viral Sara Ali Khan : कपिलने साराला विचारला शुबमनबद्दल प्रश्न, ती म्हणाली… WTC Final : विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी, 4 विक्रम मोडणार? Bollywood स्टार्सचं फिटनेस प्रेम, लक्झरी वाहनांपेक्षाही वापरतात महागडी सायकल! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचा ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास नकार न्यासा देवगणची लंडनमध्ये मस्ती, ग्लॅमरस फोटो आले समोर XL वरुन झाली मीडियम साइज, अभिनेत्रीने कसं घटवलं एवढं प्रचंड वजन? जगातील सर्वात अनोखी स्पर्धा सेक्स चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी फक्त… वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार?