अल्पवयीन मुलीनं केलं मर्जीने लग्न... मात्र शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तरुणाने केला भलताच प्रकार!
बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीला आपल्या आवडत्या तरुणासोबत लग्न करणं महागात पडलं आहे. कमी वयात स्वत:च्या मर्जीने लग्न करून लग्नानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आरोपी तरुण पीडित मुलीला सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अल्पयीन मुलीने स्वेच्छेने केलं तरुणासोबत लग्न

काही दिवसांनंतर नवरा गेला पळून अन्...

पीडित मुलीच्या आईने नोंदवली तक्रार
Crime News: बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीला आपल्या आवडत्या तरुणासोबत लग्न करणं महागात पडलं आहे. कमी वयात स्वत:च्या मर्जीने लग्न करून लग्नानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आरोपी तरुण पीडित मुलीला सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
लग्नानंतर बायकोला सोडून पळून गेला
बिहारच्या जहानाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीने तरुणासोबत स्वत:च्या मर्जीने लग्न केलं. लग्नानंतर झाल्यानंतर ती आपल्या सासरी गेली आणि काही दिवसातच तिचा नवरा घर सोडून पळून गेला. या घटनेतील पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात शहरातील दक्षिण दौलतपूर परिसरातील रहिवासी असलेल्या मुलीच्या आईने शहर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीत लग्न झालेल्या तरुणासह त्याच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांना आरोपी ठरवण्यात आलं आहे.
हे ही वाचा: पत्नीनं आपल्याच पतीचा केला खून, मृतदेह जमिनीत पुरला, नंतर स्वत: झाली सरेंडर
पंधरा दिवसांपूर्वी झालं लग्न
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 15 वर्षीय पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितलं की सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तिच्या मुलीने स्वतःच्या इच्छेने बडी कल्पा गावाचा रहिवासी असलेल्या 20 वर्षीय निकेत कुमारशी लग्न केलं होतं. त्यानंतर तो तरुण पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला. त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि काही दिवसांनी तो त्यांच्या मुलीला घरी सोडून पळून गेला.
हे ही वाचा: नवरा म्हणाला, "चल फिल्म बघू..." नंतर असं काहीतरी केलं अन् बायको जोरात ओरडली
पोलिसांचा तपास...
आता आरोपी तरुणासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क होत नाहीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाच्या घरातील लोक पीडित मुलीवर अत्याचार करत आहेत. मुलीची आई रेशमी देवी यांनी केलेल्या आरोपानुसार पीडितेचं ज्या तरुणाशी लग्न झालं होतं त्या तरुणाची बहीण, मेहुणे आणि काकू तिच्या मुलीला अन्न आणि पाणी देत नाहीत आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात गुन्हा नोंदवला असून तपास करत आहेत.