नवरा म्हणाला, "चल फिल्म बघू..." नंतर असं काहीतरी केलं की बायको जोरात ओरडली
Husband Wife: चेन्नईमधील एक जोडपं लग्नानंतर पहिल्यांदाच एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पण अचानक सिनेमागृहात नवऱ्याने असं काहीतरी केलं की बायको जोरात ओरडली. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिनेमागृहात नवऱ्याने नेमकं काय केलं?
चित्रपट बघताना बायको जोरात ओरडली...
चेन्नई: लग्नानंतर एकत्र वेळ घालवावा, अशी नवीन लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मात्र, फिरायला गेल्यानंतर चेन्नईमधील एका जोडप्यासोबत एक वेगळीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पण अचानक सिनेमागृहात नवऱ्याने असं काहीतरी केलं की बायको जोरात ओरडली. नेमकं काय घडलं?
चेन्नईमधील मंडईवेली परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या मेल्विन एग्मोर नावाच्या तरुणाचं पट्टिनापक्कमची रहिवासी असलेल्या गायत्रीसोबत लग्न झालं होतं. लग्नाला नुकताच एक महिना झाला होता. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी ते दोघे बाईकवरून पूर्वीच्या महाबलीपुरम मार्गावरील मरीना मॉलमध्ये पोहचले. मॉलमध्ये फिरल्यानंतर नवरा बायकोला म्हणाला, "चल फिल्म बघू...". त्याच्या या बोलण्यावर गायत्री देखील हो म्हणाली आणि दोघे चित्रपट बघण्यासाठी गेले.
चित्रपट सुरू झाल्यावर काही वेळानंतर...
चित्रपट सुरू झाल्यावर काही वेळानंतर मेल्विनला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या तब्येतीकडे पाहता गायत्री घाबरली. तिने सिनेमागृहातील प्रेक्षकांची मदत मागितली आणि तातडीने तिथल्या लोकांनी मेल्विनला उचलून जवळील रुग्णालयात नेलं.
मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी मेल्विनचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. हे ऐकून गायत्रीला मोठा धक्का बसला आणि जोरजोरात रडू लागली. आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचं ऐकताच तिला धक्का बसला आणि ती तिथेच बेशुद्ध झाली. त्यानंतर गायत्रीला सुद्धा रुग्णालयात भरती करून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले.









