भारतातील फुटबॉल चाहत्यांना धक्का, FIFA कडून फुटबॉल महासंघाचे निलंबन

मुंबई तक

• 02:41 AM • 16 Aug 2022

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निलंबन केले आहे. हा निर्णय तात्काळ लागू केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय फुटबॉलमध्ये बरं चालेलंल नाही. आता फिफाच्या या निर्णयाने चाहत्यांची मनं तुटली आहेत. फिफाने केल निलंबित फुटबॉलची मुख्य संस्था FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला […]

Mumbaitak
follow google news

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निलंबन केले आहे. हा निर्णय तात्काळ लागू केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय फुटबॉलमध्ये बरं चालेलंल नाही. आता फिफाच्या या निर्णयाने चाहत्यांची मनं तुटली आहेत.

हे वाचलं का?

फिफाने केल निलंबित

फुटबॉलची मुख्य संस्था FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे निलंबीत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे फिफाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे निलंबन दीर्घकाळापासून सुरू होते. फिफाने सांगितले की AIFF वर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. फिफाने निलंबन केल्यामुळे, भारत यापुढे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही किंवा कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

नियमांचे उल्लंघन केल्याने केले निलंबीत

फिफाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फिफा परिषदेच्या ब्युरोने तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यानेच हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफमधील अनियमितता लक्षात घेऊन निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर फिफाने हे कठोर पाऊल उचलले आहे.

17 वर्षांखालील विश्वचषक होणार नाही

या निलंबनामुळे यंदा भारतात होणाऱ्या अंडर-19 महिला विश्वचषकावरही ग्रहणाचे ढग दाटले आहेत. तो विश्वचषक आता आयोजित केला जाणार नाही. हा विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.

दरम्यान क्रिकेटप्रमाणेच भारतातही फुटबॉलचे चाहते आहेत. भारतीय फुटबॉलला अलिकडच्या काळात अच्छे दिन आल्याचे बोलले जात होते. परंतु आता फिफाने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे पुन्हा एकदा भारतीय फुटबॉलकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.

    follow whatsapp