Harmanpreet Kaur : हरमनप्रीतला माजी कर्णधाराने फटकारलं, विराटची अनुष्का आली धावून

ICC महिला T20 विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या धावबाद झाल्यामुळे सगळेच निराश झाले. भारतीय महिला संघाची माजी कर्णधार डायना एडुलजीने हरमनप्रीत कौरला फटकारत तिच्या रनआउटवर टीका केली. डायना एडुल्जी म्हणाल्या, ‘बॅट अडकली असा ती विचार करतेय, परंतु जर दुसरी धाव पाहिली […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:06 AM • 26 Feb 2023

follow google news

हे वाचलं का?

ICC महिला T20 विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

उपांत्य फेरीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या धावबाद झाल्यामुळे सगळेच निराश झाले.

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार डायना एडुलजीने हरमनप्रीत कौरला फटकारत तिच्या रनआउटवर टीका केली.

डायना एडुल्जी म्हणाल्या, ‘बॅट अडकली असा ती विचार करतेय, परंतु जर दुसरी धाव पाहिली तर ती जॉगिंग करताना दिसते.’

‘विकेट इतकी महत्त्वाची आहे हे माहीत असताना आरामात का करता? जिंकण्यासाठी तुला प्रोफेशनल क्रिकेट खेळावे लागेल.’

इडुलजी यांनी शेफाली वर्मा आणि जेमिमा यांच्या खराब शॉट निवडीबद्दल टीका केली.

हरमनप्रीत कौर तिच्या पराभवानंतर म्हणाली, ‘कधीकधी क्रिकेटमध्ये असं घडतं आणि जे घडतं ते स्वीकारावे लागते.’

भारताच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरचा एक फोटो समोर आला होता ज्यामध्ये ती काळ्या चष्म्यात दिसली.

अभिनेत्री अनुष्का शर्माने हा फोटो शेअर करत लिहिलं, ‘तुझा आणि तुझ्या टीमचा नेहमीच अभिमान आहे.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp