Ind Vs Aus : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला गळती; 50 धावात निम्मा संघ तंबूत

मुंबई तक

01 Mar 2023 (अपडेटेड: 18 Apr 2023, 01:08 PM)

टीम इंडियाने येथे 45 धावांवर आपले पाच विकेट गमावले होते. कांगारू संघाच्या फिरकीने येथील प्रत्येकाला घेरले होते. 81 धावांवर भारताचे 7 गडी बाद झाले.

Ind Vs Aus Test Match

Ind Vs Aus Test Match

follow google news

Border Gavaskar Series : इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Australia) यांच्यात इंदूरमध्ये (Indore) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या तासात असं काही घडलं की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. (Cricket Pitch ) खेळपट्टीबाबत सतत चर्चा होत होती, पण इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन (Australian Spinner) फिरकीसमोर सर्व काही अपयशी ठरले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय चुकीचा ठरला. (Indian team in trouble, 7 wicket loss in 81 runs)

हे वाचलं का?

कसोटी सामन्याच्या पहिल्या तासात टीम इंडियाचा निम्मा संघ बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर, विराट कोहली, श्रीकर भारत यांची जणू शर्यतच लागली होती. टीम इंडियाने येथे 45 धावांवर आपले पाच विकेट गमावले होते. कांगारू संघाच्या फिरकीने येथील प्रत्येकाला घेरले होते. 81 धावांवर भारताचे 7 गडी बाद झाले.

भारतीय विकेट

• 1-27 रोहित शर्मा, 5.6 षटके
• 2-34 शुभमन गिल, 7.2 षटके
• 3-36 चेतेश्वर पुजारा, 8.2 षटके
• 4-44 रवींद्र जडेजा, 10.5 षटके
• 5-45 श्रेयस अय्यर, 11.2 षटके
• 6-70 विराट कोहली, 21.4 षटके
• 7- 81 श्रीकर भारत, 24.5 षटके

ऑस्ट्रेलियासाठी त्यांच्या फिरकीपटूंनी येथे शानदार कामगिरी केलीय. इंदूरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करू शकते, असे पूर्वी सांगितले जात होते, परंतु पहिल्या पाच षटकांतच चेंडू वळू लागला. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुनहनमनने 3, तर नॅथन लायनने 3 तर टॉड मर्फीने 1 विकेट्स घेतल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरला होता. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद होता. पहिलाच बॉल बॅटची कड घेऊन किपरने टिपला, अपील झाली, मात्र अम्पायरने नॉटआऊट दिलं. ऑस्ट्रेलियाने पण डीआरएस न घ्यायची चूक केली. मात्र रोहित शर्मा जीवदानचा फारसा फायदा घेऊ शकला नाही. नंतर 12 धावा करून तो बाद झाला.

कोणी किती धावा केल्या?

रोहित शर्मा – 12 धावा, 23 चेंडू
शुभमन गिल – 21 धावा, 18 चेंडू
चेतेश्वर पुजारा – 1 धाव, 4 चेंडू
रवींद्र जडेजा – 4 धावा, 9 चेंडू
श्रेयस अय्यर – 0 धावा, 2 चेंडू
विराट कोहली – 22 धावा, 52 चेंडू
श्रीकर भारत – 17 धावा, 30 चेंडू

भारताचे प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, एस. भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग-11: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टी. मर्फी, नॅथन लियॉन, एम. कुनहानेमन

    follow whatsapp