IPL 2025 latest Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमालगतच्या भागात सीजफायर होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टनंतर दोन्ही देशात युद्धविराम झाल्याचं सांगितलं जात आहे. अशातच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) लवकरच इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सुरु करण्याबाबत घोषणा करू शकते.
ADVERTISEMENT
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव लक्षात घेता शुक्रवारी आयपीएलचे सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. आयपीएल टूर्नामेंट पुन्हा कधी सुरु होणार, याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आली नाहीय. परंतु, युद्धविराम लागल्याने बीसीसीआयकडून लवकरच आयपीएल सुरु करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
हे ही वाचा >> सगळ्यात मोठी बातमी... 'भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम', US राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा
आयपीएलमध्ये आतापर्यंत 57 सामने झाले, पण 58 वा सामना
आयपीएल 2025 मध्ये एकूण 57 सामने पूर्ण झाले होते. 58 वा सामना धरमशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येत होता. परंतु, 10.1 षटकानंतर हा सामना बंद करण्यात आला. हा सामना पुन्हा खेळवला जाईल की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आता लीग स्टेजचे 12 सामने आहेत. त्यानंतर प्ले ऑफचे 4 सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या शेड्युलनुसार हैदराबादमध्ये क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर होणार होतं. तर कोलकातामध्ये क्वालिफायर 2 आणि फायनलचा सामना खेळवला जाणार होता.
हे ही वाचा >> IPL 2025 Update : आता पुन्हा मैदानात रंगणार आयपीएलचा थरार! BCCI करणार नव्या तारखांची घोषणा
कधी कधी आलं आयपीएलवर संकट?
याआधीही 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये केलं होतं. 2020 मध्ये एप्रिल-मे मध्ये कोरोना महामारीमुळे आयपीएलचं आयोजन सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये भारत बायो बबलमध्ये टूर्नामेंट सुरु झालं होतं. परंतु, खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलचे सामने थांबवण्यात आले होते.
ADVERTISEMENT
