Pakistan player fined after alleged misconduct with female hotel staff : टी-20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ आता एका मोठ्या वादात अडकला आहे. टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या वर्ल्डकप टीममधील एका खेळाडूने श्रीलंकेत मुक्कामादरम्यान हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. ही घटना सुपर-8 फेरीतील श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी कॅन्डी येथे घडली असल्याची माहिती समोर आलीये.
ADVERTISEMENT
पाकिस्तानी क्रिकेटपटूचं हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन
हा सर्व प्रकार 'गोल्डन क्राऊन' या हॉटेलमध्ये घडला, जिथे पाकिस्तानी संघ वास्तव्यास होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघातील एका खेळाडूने हाऊसकीपिंग विभागातील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. संबंधित महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर हॉटेलमधील इतर कर्मचारी तेथे धावून आले. यानंतर हे प्रकरण तातडीने पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा यांच्याकडे नेण्यात आले.
हेही वाचा : लग्नानंतर पतीसाठी नोकरी सोडली... पण सासरी मिळाली 'ती' वागणूक; शेवटी इंजिनीअर पत्नीने संपवलं आयुष्य
पाकच्या खेळाडूने माफी मागून भरला दंड
हॉटेल व्यवस्थापनाने या खेळाडूवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, व्यवस्थापक नवीद चीमा यांनी हॉटेल प्रशासनाची माफी मागितली आणि संबंधित खेळाडूला शिस्तभंगाबद्दल दंड ठोठावला. यानंतर हे प्रकरण स्थानिक पातळीवर मिटवण्यात आले. जरी या खेळाडूची ओळख अद्याप उघड करण्यात आली नसली, तरी संघ पाकिस्तानात परतल्यानंतर या खेळाडूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.
एकीकडे पाकिस्तानचा संघ नेट रन-रेटमुळे उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरल्याने चाहत्यांमध्ये नाराजी असतानाच, आता या मैदानाबाहेरील कृत्यामुळे संघावर टीकेची झोड उठत आहे. श्रीलंकेचा पराभव करूनही स्पर्धेतून बाहेर पडलेल्या पाकिस्तान संघाच्या अडचणी या वादामुळे अधिकच वाढल्या आहेत. शिस्तपालन समिती आता या खेळाडूवर अधिक कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











