IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या झंजावातापुढे हैदराबाद नामोहरम, ८ विकेटने जिंकला सामना

मुंबई तक

• 05:42 PM • 22 Sep 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा आपला झंजावात कायम ठेवला आहे. दुबईच्या मैदानावर दिल्लीने हैदराबादवर ८ विकेट राखून मात केली. शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. हैदराबादच्या संघाने या सामन्यात निराशाजनक खेळ केला. पहिल्यांदा बॅटींग करताना सनराईजर्स हैदराबाद संघाची सुरुवातच खराब झाली. नॉर्ट्जेच्या […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा आपला झंजावात कायम ठेवला आहे. दुबईच्या मैदानावर दिल्लीने हैदराबादवर ८ विकेट राखून मात केली. शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. हैदराबादच्या संघाने या सामन्यात निराशाजनक खेळ केला.

हे वाचलं का?

पहिल्यांदा बॅटींग करताना सनराईजर्स हैदराबाद संघाची सुरुवातच खराब झाली. नॉर्ट्जेच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नर भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर वृद्धीमान साहा आणि कॅप्टन केन विल्यमसनने दुसऱ्या विकेटसाठी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू कगिसो रबाडाने साहाला आऊट करत हैदराबादची जोडी फोडली. यानंतर हैदराबादचे फलंदाज मैदानावर तग धरुच शकले नाहीत.

कसोटी प्रमाणे IPL ही रद्द होतं का ते पाहूया…इंग्लंडच्या माजी खेळाडूचा BCCI ला टोमणा

ठराविक अंतराने हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. मधल्या फळीत अब्दुल समद आणि राशिद खानने फटकेबाजी करत संघाला १३४ धावांपर्यंत पोहचवलं. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ३, अक्षर पटेल-नॉर्ट्जेने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

धक्कादायक ! IPL च्या गोटात पुन्हा Corona चा शिरकाव, SRH च्या टी. नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह

प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ ११ धावा काढून खलिल अहमदच्या बॉलिंगवर माघारी परतला. परंतू यानंतर शिखर धवनने श्रेयस अय्यरसोबत संघाचा डाव सावरत हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केल्यानंतर राशिद खानने शिखर धवनला आऊट करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. परंतू तोपर्यंत सामन्यातं पारडं दिल्लीच्या दिशेने झुकलं होतं. श्रेयस अय्यरने ऋषभ पंतच्या सहाय्याने हैदराबादच्या बॉलर्सवर तुटून पडत विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत विजय प्राप्त केला. अय्यरने नाबाद ४७ तर पंतने नाबाद ३५ धावा केल्या. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत पुन्हा पहिल्या स्थानावर आली आहे.

    follow whatsapp