SA vs IND : लोकेश राहुलकडे वन-डे संघाचं नेतृत्व, जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर नवीन जबाबदारी

मुंबई तक

• 03:21 PM • 31 Dec 2021

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी लोकेश राहुलकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आलेली असून जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुखापतग्रस्त रोहित शर्मा वन-डे मालिकाही खेळू शकणार नसल्यामुळे लोकेश राहुलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आफ्रिका दौऱ्यावर येण्याआधी रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-२० आणि […]

Mumbaitak
follow google news

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी लोकेश राहुलकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आलेली असून जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुखापतग्रस्त रोहित शर्मा वन-डे मालिकाही खेळू शकणार नसल्यामुळे लोकेश राहुलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

आफ्रिका दौऱ्यावर येण्याआधी रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-२० आणि वन-डे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतू सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला दौऱ्याला मुकावं लागलं होतं.

वन-डे मालिकेसाठी असा असणार आहे भारताचा संघ –

लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन आश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

SA vs IND : राहुलच्या शतकाने संपवला भारताचा दक्षिण आफ्रिकेतला १४ वर्षांचा वनवास

सेंच्युरिअन येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे यानंतर दोन कसोटी सामन्यानंतर भारत वन-डे मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

U-19 Asia Cup : श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारतीय संघाने जिंकला आशिया चषक

    follow whatsapp