विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा, श्रेयस अय्यरचं कमबॅक

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भानावर आलेल्या मुंबईने विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. संघाची निवड करण्याआधी MCA ने १०० संभाव्य खेळाडूंची नाव काढून त्यात ४ संघ तयार करुन आधी सराव सामने खेळवले होते. यात चांगली कामगिरी करणाऱ्या प्लेअर्सला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलंय. श्रेयस अय्यरने मुंबईच्या संघात पुनरागमन केलं असून त्याच्याकडे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:59 AM • 10 Feb 2021

follow google news

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भानावर आलेल्या मुंबईने विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. संघाची निवड करण्याआधी MCA ने १०० संभाव्य खेळाडूंची नाव काढून त्यात ४ संघ तयार करुन आधी सराव सामने खेळवले होते. यात चांगली कामगिरी करणाऱ्या प्लेअर्सला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलंय.

हे वाचलं का?

श्रेयस अय्यरने मुंबईच्या संघात पुनरागमन केलं असून त्याच्याकडे टीमची कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या पृथ्वी शॉला संघाचं उप-कर्णधारपद देण्यात आलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सराव सामन्यांमध्ये खराब कामगिरी केलेल्या अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. अर्जुनला एका सराव सामन्यात संधी देण्यात आली ज्यात त्याची कामगिरी ४.१ ओव्हर, ५३ रन्स आणि ० विकेट अशी होती. इतकच नव्हे तर या सामन्यात त्याने ९ वाईड बॉल टाकले.

असा असेल मुंबईचा विजय हजारे ट्रॉफीसाठीचा संघ –

श्रेयस अय्यर (कॅप्टन), पृथ्वी शॉ (व्हाईस कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, अखिल हेरवाडकर, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, आकाश पारकर, अतिफ अत्रावाला, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, सुजीत नायक आणि तुषार कोटीयन

२० फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधी सहा शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. ज्यात सूरत, इंदूर, बंगळुरु, जयपूर, कोलकाता, तामिळनाडू (शहर निश्चीत नाही) मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. १३ फेब्रुवारीला सर्व टीम्स बीसीसीआयच्या बायो बबलमध्ये प्रवेश करतील यानंतर सर्वांची कोरोना चाचणी व सर्व नियमांचं काटेकोर पद्धतीने पालनं केलं जाईल.

यंदाच्या स्पर्धेसाठी संघांची अशी असेल गटवारी –

एलिट ए गट (सूरत) – गुजरात, छत्तीसगड, त्रिपुरा, हैदराबाद, बडोदा आणि गोवा

एलिट बी गट (इंदूर) – तामिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश

एलिट सी गट (बंगळुरु) – कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडीशा, रेल्वे आणि बिहार

एलिट डी गट (जयपूर) – दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पाँडेचरी

प्लेट गट (तामिळनाडू, शहर निश्चीत नाही) – उत्तराखंड, नागालँड, आसाम, मेघालय, मणीपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि सिक्कीम

    follow whatsapp