Ind Vs Pak : पाकिस्तान 2023 चं वर्ल्ड कप खेळणार नाही? हे कारण आलं समोर

मुंबई तक

• 10:53 AM • 05 Feb 2023

Pakistan Cricket Team : भारतीय क्रिकेटकडून (Indian Cricket) पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) बैठकीत भारताने आशिया चषक 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे (Never play in Pakistan). यानंतर पाकिस्तानची अवस्था वाईट झाली असून आता 2023चा वनडे वर्ल्ड कप न खेळण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली […]

Mumbaitak
follow google news

Pakistan Cricket Team : भारतीय क्रिकेटकडून (Indian Cricket) पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) बैठकीत भारताने आशिया चषक 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे (Never play in Pakistan). यानंतर पाकिस्तानची अवस्था वाईट झाली असून आता 2023चा वनडे वर्ल्ड कप न खेळण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली आहे. Pakistan will not play the World Cup in India

हे वाचलं का?

भारत-पाकिस्तान कधी आणि कुठे खेळणार? पहा वर्षभराचं वेळापत्रक

वृत्तानुसार, आशिया चषकासाठी पाकिस्तानला न जाण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खूपच नाराज आहे. जर आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित केला गेला तर फक्त टीम इंडियाच त्यात सहभागी होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिलसारखे खेळाडू कोणत्याही स्पर्धेत नसताना त्यांचे खेळाडू पाकिस्तानात जाणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले आहे, तेव्हा प्रायोजक स्वतःहून माघार घेतील.

रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर आशिया कप 2023 पाकिस्तानच्या बाहेर हलवला गेला तर पाकिस्तान भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होणार नाही. भारताच्या निषेधानंतर आशिया चषक यूएईमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआय असा निर्णय घेत आहे.

भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर; जय शाहांची घोषणा

भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध फार दिवसांपासून चांगले नाहीत. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. अलीकडेच 2022 साली झालेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता, तेव्हा टीम इंडियाने बाजी मारली होती.

    follow whatsapp