भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका; डोक्याला बॉल लागल्याने हा स्टार प्लेयर रुग्णालयात

मुंबई तक

• 07:11 AM • 21 Oct 2022

T20 विश्वचषक 2022 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाला 23 ऑक्टोबरला भारतीय संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच संघाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे रुग्णालयात पोहोचला आहे. हा स्टार फलंदाज आहे शान मसूद, नेट प्रॅक्टिसदरम्यान डोक्याला मार लागला होता. यानंतर त्यांना स्कॅनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानला […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

T20 विश्वचषक 2022 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाला 23 ऑक्टोबरला भारतीय संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच संघाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे रुग्णालयात पोहोचला आहे. हा स्टार फलंदाज आहे शान मसूद, नेट प्रॅक्टिसदरम्यान डोक्याला मार लागला होता. यानंतर त्यांना स्कॅनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानला रविवारीच भारताविरुद्ध सामना खेळायचा आहे, मात्र शान मसूदच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

शान मसूदचा व्हिडिओही व्हायरल झाला होता

शान मसूदचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो दुखापतीनंतर जमिनीवर पडलेला दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानी खेळाडू आणि कर्मचारी शान मसूदकडे धावत जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, फिजिओ आणि वैद्यकीय कर्मचारी देखील त्यांच्यावर ताबडतोब उपचार करतात, परंतु नंतर त्याला स्कॅनसाठी नेले जाते, जेणेकरून दुखापतीचे गांभीर्य कळू शकेल.

नेमकं काय झालं होत?

शान मसूद मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) पाकिस्तान संघासोबत नेट प्रॅक्टिस करत होता. यादरम्यान मोहम्मद नवाजचा एक शॉट बॉल त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला आला. ही दुखापत किती धोकादायक असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या स्कॅन रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

दिवाळीपूर्वी भारत-पाकिस्तान सामना

T20 विश्वचषक 2022 चा हंगाम उद्यापासून (22 ऑक्टोबर) सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला एकमेकांविरुद्ध होणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी मेलबर्नमध्ये हा सामना होणार आहे.

T20 विश्वचषकासाठी भारत-पाकिस्तान पूर्ण संघ:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तान संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.

    follow whatsapp