ADVERTISEMENT
टीम इंडियावर आता यापुढील काहीकाळ मुंबईच्या रोहित शर्माची सत्ता असणार आहे. विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितकडे टी-२० आणि वन-डे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.
आता रोहितकडे भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
क्रिकेटच्या तीनही प्रकारात स्वतःला सिद्ध करणाऱ्या रोहित शर्माचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या लाईफ स्टाईलमुळे काही जण त्यांचे चाहते आहेत.
स्वतःची वेगळी लाईफ स्टाईल असणाऱ्या रोहित शर्माला महागड्या कारची आवड आहे. कारसोबतचे फोटो तो सोशल मीडियातून शेअर करताना दिसतो.
रोहित शर्मा सध्या कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. रोहित शर्माकडे सध्या 200 कोटींपेक्षा अधिक निव्वळ संपत्ती आहे.
रोहित शर्माकडे BMW 5M सीरिजची एक कार आहे. या कारची किंमत 1.60 कोटींपेक्षा अधिक आहे.
मुंबईतील वरळीमध्ये रोहितचा अलिशान फ्लॅट आहे. अहुजा टॉवर बिल्डिंगमधील 29व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे.
सुरूवातीच्या काळात इंग्लडमधील गायिका सोफिया हयातसोबत रोहित शर्माचं अफेअर असल्याचीही चर्चा होती.
गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये रोहित शर्माकडील निव्वळ संपत्ती 160 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. रोहित शर्माला आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने 16 कोटींमध्ये खरेदी केलेलं आहे.
याशिवाय रोहित शर्माकडे एक मर्सिडीज, ऑडी, स्कोडा लॉरा, टोयाटो फॉर्च्युन आणि आणखी एक कार आहे.
ADVERTISEMENT
