विश्वचषक जिंकला, आता स्मृती मंदानाच्या लग्नाचा बार उडणार, सांगलीत पार पडणार विवाह सोहळा

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding News : विश्वचषक जिंकला, आता स्मृती मंदानाच्या लग्नाचा बार उडणार, सांगलीत पार पडणार विवाह सोहळा

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding News

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding News

मुंबई तक

03 Nov 2025 (अपडेटेड: 03 Nov 2025, 08:58 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विश्वचषक जिंकला, आता स्मृती मंदानाच्या लग्नाचा बार उडणार

point

सांगलीत पार पडणार विवाह सोहळा

हे वाचलं का?

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding News : भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी इतिहास घडवला. आयसीसी महिला विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करत भारताने थेट विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. घरच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत विश्वचषक जिंकला आणि देशवासीयांना आनंदोत्सवाची संधी दिली. याआधी टीम इंडियाचं दोन वेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारूनही विश्वविजेतेपद हातातून निसटलं होतं. मात्र, यंदा भारताने ती खंत मिटवत पहिल्यांदाच ट्रॉफी आपल्या नावावर केली. अखेरच्या क्षणापर्यंत लढाऊ वृत्ती आणि उत्कृष्ट खेळाची झलक दाखवत भारतीय संघाने प्रभावी विजय मिळवला. या विजयासह भारताने महिला विश्वचषक जिंकणारा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतरचा चौथा संघ म्हणून आपलं नाव इतिहासात नोंदवलं. उल्लेखनीय म्हणजे, भारताने महिला विश्वचषकात पहिल्यांदा 1978 साली सहभाग घेतला होता. दरम्यान, या विजयानंतर टीम इंडियाची दिग्गज फलंदाज स्मृती मंदाना हिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

सांगलीत विवाहसोहळा पार पडणार असल्याची चर्चा 

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदाना लवकरच संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. या लोकप्रिय जोडीचा विवाह लवकरच पार पडणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. दोघांनीही आपल्या नात्याबाबत उघडपणे बोललं भाष्य केल असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं . दोन्ही घरात लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : ICC Women 2025 world cup: पोरींनी जग जिंकलं! भारताच्या महिलांनी रचला इतिहास, पटकावला पहिलावहिला विश्वचषक!

स्मृती आणि पलाशचं लग्न कुठे होणार? याबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वर्ल्डकपनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरपासून लग्नसमारंभांना प्रारंभ होईल आणि मुख्य विवाह सोहळा सांगलीत पार पडेल. सांगलीतच लग्न का, असा प्रश्न अनेकांना पडला असला, तरी त्याचं कारण सोपं आहे. स्मृती मंदाना दोन वर्षांची असल्यापासून सांगलीतील माधवनगर भागात राहते. तिचं संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण सांगलीतच झालं आहे. त्यामुळे तिच्या आयुष्याशी जोडलेल्या या शहरातच लग्न होणार आहे.

दरम्यान, पलाश मुच्छल सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘राजू बाजेवाला’च्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यानं सांगितलं, “स्मृती लवकरच इंदूरची सून होईल.” या वक्तव्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. दोघांच्या नात्याचा मागोवा घेतला तर, स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. जुलै 2024 मध्ये त्यांनी प्रेमाचं नातं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. . नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पलाशनं पुन्हा एकदा लग्नाबाबत संकेत दिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता क्रिकेट आणि संगीत या दोन क्षेत्रांतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांच्या या लग्नसोहळ्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रावसाहेब दानवे यांच्या नातवावर 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यांकडून नाशकात तक्रार दाखल

    follow whatsapp