Tokyo Olympic 2020 : बॉक्सर पुजा राणी पदकापासून एक पाऊल दूर, अल्जेरियाच्या बॉक्सरवर केली मात

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला बॉक्सर पुजा राणीने आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. ७५ किलो वजनी गटात पुजा राणीने अल्जेरियाच्या इचराक चैबचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण सामन्यावर पुजा राणीने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पंचांनी ५-० च्या फरकाने पुजा राणीच्या पारड्यात एकमताने आपलं मत टाकलं. चैबच्या तुलनेत पुजा राणीचा अनुभव खूप जास्त आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:11 AM • 28 Jul 2021

follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला बॉक्सर पुजा राणीने आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. ७५ किलो वजनी गटात पुजा राणीने अल्जेरियाच्या इचराक चैबचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण सामन्यावर पुजा राणीने निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

हे वाचलं का?

पंचांनी ५-० च्या फरकाने पुजा राणीच्या पारड्यात एकमताने आपलं मत टाकलं. चैबच्या तुलनेत पुजा राणीचा अनुभव खूप जास्त आहे. मैदानात याचा पुरेपूर प्रत्यय येत होता. चैबने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत पुजाराणीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. परंतू पुजाराणीने आपल्या अनुभवाच्या जोरावर शांत आणि संयमी खेळ करत सामन्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही.

Asian Championship जिंकून ऑलिम्पिकचं तिकीट मिळणारी पहिली बॉक्सर हा मान पुजाराणीने पटकावला होता. Asian Championship सोबत World Championships मध्येही पुजाराणीने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे आगामी फेरीत पुजाराणी कसा खेळ करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp