वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुनही विराटची गच्छंती? BCCI मध्ये हालचालींना सुरुवात

मुंबई तक

• 02:28 PM • 02 Nov 2021

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे सर्वच स्तरात नाराजीचं वातावरण आहे. विराटने टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होण्याआधीच आपण स्पर्धेनंतर कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतू पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर विराटला वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुनही हटवण्याची तयारी सुरु झाली आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये बीसीसीआयची एक बैठक होणार आहे. या […]

Mumbaitak
follow google news

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे सर्वच स्तरात नाराजीचं वातावरण आहे. विराटने टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होण्याआधीच आपण स्पर्धेनंतर कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतू पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर विराटला वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुनही हटवण्याची तयारी सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये बीसीसीआयची एक बैठक होणार आहे. या बैठकीत विराटला वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला जाणार असून भारताच्या आगामी कर्णधारपदाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्माच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !

टी-२० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्र सोपवण्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतू प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चेत ही जबाबदारी रोहितकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

New Zealand विरुद्ध मालिकेत भारताचं नेतृत्व लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता

टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला होता.

    follow whatsapp