Ind Vs Pak : वकार युनूसने मोहम्मद रिझवानच्या नमाज पठणावर केलेल्या विधानावर का निर्माण झालं वादंग?

मुंबई तक

• 04:40 PM • 26 Oct 2021

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर १० विकेट राखून विजय मिळवला. वर्ल्डकप लढतीच्या इतिहासात पाकिस्तानने भारतावर मात करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. परंतू या विजयानंतर विविध प्रकारच्या वक्तव्य समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाने निराश झालेल्या भारतीय चाहत्यांनी मोहम्मद शमीला ट्रोल केल्याचं प्रकरण ताजं असताना माजी पाकिस्तानी खेळाडू वकार युनूसच्या वक्तव्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तान […]

Mumbaitak
follow google news

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर १० विकेट राखून विजय मिळवला. वर्ल्डकप लढतीच्या इतिहासात पाकिस्तानने भारतावर मात करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. परंतू या विजयानंतर विविध प्रकारच्या वक्तव्य समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाने निराश झालेल्या भारतीय चाहत्यांनी मोहम्मद शमीला ट्रोल केल्याचं प्रकरण ताजं असताना माजी पाकिस्तानी खेळाडू वकार युनूसच्या वक्तव्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर, ARY News या पाकिस्तानी वाहिनीवर चर्चेदरम्यान वकार युनूसने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या खेळीचं कौतुक केलं. “बाबर आणि रिझवान ज्या पद्धतीने खेळले ते खरंच कौतुकास्पद होतं. दोघांनीही आक्रमक पण तितकाच संयमी खेळ केला. स्ट्राईक रोटेशन, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हे सर्वकाही पाहण्यासारखं होतं. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहम्मद रिझवानने मैदानात एवढ्या हिंदूंसमोर नमाज पठन केलं. माझ्यासाठी हे खूप खास होतं.”

वकार युनूसचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीका होत असताना भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनीही वकार युनूसचा समाचार घेतला आहे. “वकार युनूससारख्या खेळाडूने असं वक्तव्य करणं हे खूपच निराशाजनक आहे. या खेळाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून तुम्ही फक्त क्रिकेटपटू म्हणून विचार करायला हवा. मला आशा आहे की वकार याबद्दल माफी मागेल. आपल्याला क्रिकेट जगताला एकत्र करायचंय, धर्माच्या आधारावर ते विभागायचं नाहीये.”

BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !

मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या जोडीने पहिल्याच सामन्यात भारतीय बॉलर्सचा समाचार घेतला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबर आझमने नाबाद ६८ धावांची इनिंग खेळली. भारताचे सर्व बॉलर पाकिस्तानी फलंदाजांसमोर हतबल दिसले.

तुमच्या खेळाडूंचा आदर करा ! शमीला ट्रोल करणाऱ्यांना पाकिस्तानी खेळाडूनेही सुनावलं

    follow whatsapp