Saurabh Ganguly: ‘भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल’ परवेझ मुशर्रफ, सौरभ गांगुलीला असं का म्हणाले होते?

रोहिणी ठोंबरे

01 Sep 2023 (अपडेटेड: 01 Sep 2023, 03:20 PM)

परवेझ मुशर्रफ यांचा आणखी एक किस्सा आहे जेव्हा त्यांनी एकदा टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुलीला फोन करून मोठा इशारा दिला होता आणि दोन देशांमध्ये युद्ध सुरू होईल असं सांगितलं होतं.

Mumbaitak
follow google news

Pervez Musharraf Sourav Ganguly : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांचं वयाच्या 79 व्या वर्षी निधन झालं. त्यांचा कार्यकाळ भारतासोबतच्या संबंधांच्या दृष्टीने अतिशय वादग्रस्त ठरला, कारण त्यांच्या राजवटीतच पाकिस्तानने कारगिलमध्ये भारताचा विश्वासघात केला, पण राजकारणाव्यतिरिक्त परवेझ मुशर्रफ हे क्रिकेटचेही मोठे चाहते होते. (Why did Pervez Musharraf say this to Saurabh Ganguly there will be a war between India and Pakistan)

हे वाचलं का?

परवेझ मुशर्रफ यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) केसांची स्तुती केल्याची कहाणी प्रत्येकाच्या लक्षात आहे . पण परवेझ मुशर्रफ यांचा आणखी एक किस्सा आहे जेव्हा त्यांनी एकदा टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुलीला फोन करून मोठा इशारा दिला होता आणि दोन देशांमध्ये युद्ध सुरू होईल असं सांगितलं होतं.

Kaushal Kishore : केंद्रीय मंत्र्याचे घर, मुलाचे पिस्तूल, मित्राचा मृत्यू कसा; Inside Story

खरं तर, या कहाणीचा उल्लेख सौरव गांगुलीने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. सौरव गांगुलीच्या ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकात त्याने त्याच्या पाकिस्तान दौऱ्याचा उल्लेख केला आहे . टीम इंडियाने 2004 साली पाकिस्तान दौऱ्यावर जाऊन यजमान संघाचा पराभव केला होता. तेव्हा सौरव गांगुली टीम इंडियाचा कर्णधार होता.

सौरव गांगुलीने आपल्या पुस्तकात लिहिलंय की, ‘2004 साली आम्ही पाकिस्तानात गेलो होतो तेव्हा आमच्यासाठी खूप सुरक्षा होती. एवढी सुरक्षा मी कधीच पाहिली नव्हती, आम्ही लाहोरमध्ये एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. ते एका किल्ल्यासारखं होतं. पण तुमचा विश्वास बसणार नाही की, त्या सुरक्षेतही मी भारतीय कर्णधार म्हणून त्यांना चकमा देऊ शकलो आणि हॉटेलमधून बाहेर पडलो. ‘

Ajit Pawar : ‘वन नेशन, वन इलेक्शन देशासाठी महत्वाचे’ अजितदादांकडून मोदींचा उदोउदो..

सौरव गांगुलीने लिहिलं की, ‘मला माहित होतं की मी नियमांचे उल्लंघन करत आहे, परंतु बंदुका आणि रणगाड्यांच्या कडक सुरक्षेतून बाहेर पडणं आवश्यक होतं. माझे काही मित्र पाकिस्तानातील प्रसिद्ध गवळमंडी येथे जाण्याचा विचार करत होते, जिथे पाकिस्तानचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड मिळते. मी पण त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला. मी सुरक्षा रक्षकांना सांगितलं नाही आणि फक्त संघ व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांना सांगितलं. मी टोपी घातली आणि माझ्या मित्रांसोबत बाहेर गेलो, तिथे काही लोकांनी मला मार्केटमध्ये ओळखलं आणि विचारलं की, तू सौरव गांगुली आहेस ना? मी काहींना नकार दिला. पण ते म्हणाले की मी त्याच्यासारखा दिसतो.’

सौरव गांगुलीने पुढे लिहिलं होतं की, ‘दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मला परवेझ मुशर्रफचा फोन आला आणि ते म्हणाले की, आता असं काहीही करू नका कारण काही झालं तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल. मी त्यांना याबद्दल समजावून सांगितलं की मला थोडं स्वातंत्र्य हवं होतं म्हणून मी निघून गेलो. आतापासून असं करणार नाही.’

    follow whatsapp