T20 World Cup Squad: टी-20 विश्वचषकासाठी भारत संघ बदलणार?, ICC चा ‘तो’ नियम येणार कामी

टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त दोन आठवडे उरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकासाठी जवळपास 16 संघ आमने-सामने येणार आहेत. भारताने आपला संघ जाहीर केला असला तरी दुखापतीमुळे भारतीय संघ सतत त्रस्त आहे. भारतीय संघाला अजूनही संघात बदल करण्याची संधी आहे आणि शेवटच्या क्षणी काही खेळाडूंना टी-20 विश्वचषकाच्या संघात आणले जाऊ शकते. आयसीसीच्या नियमांनुसार, संघ 9 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:59 AM • 29 Sep 2022

follow google news

टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त दोन आठवडे उरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकासाठी जवळपास 16 संघ आमने-सामने येणार आहेत. भारताने आपला संघ जाहीर केला असला तरी दुखापतीमुळे भारतीय संघ सतत त्रस्त आहे. भारतीय संघाला अजूनही संघात बदल करण्याची संधी आहे आणि शेवटच्या क्षणी काही खेळाडूंना टी-20 विश्वचषकाच्या संघात आणले जाऊ शकते.

हे वाचलं का?

आयसीसीच्या नियमांनुसार, संघ 9 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या टी-20 विश्वचषक संघात बदल करू शकतो. त्याचबरोबर थेट सुपर-12 मध्ये पोहोचलेल्या संघांना ही संधी 15 ऑक्टोबरपर्यंत आहे. म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत टीम इंडिया आपल्या संघात बदल करू शकते. यानंतरही आयसीसीची विशेष परवानगी घेऊन भारत आपल्या संघात बदल करू शकतो.

टीम इंडिया दुखापतींमुळे त्रस्त

सर्वप्रथम रवींद्र जडेजाला दुखापत झाली, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. त्यानंतर दीपक हुडाला दुखापत झाली, जो टी-20 विश्वचषक संघाचा भाग आहे. यानंतर जसप्रीत बुमराहबद्दल सतत शंका व्यक्त केली जात आहे, कारण तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला नाही.

कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते?

भारताने टी-20 विश्वचषक संघासाठी 15 खेळाडूंची घोषणा केली असून, चार खेळाडूंना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. संघात बदल झाल्यास या चार खेळाडूंपैकी एकाला संघात प्रवेश मिळू शकतो. ज्यामध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश आहे. त्याच बरोबर त्यांच्या जागी बाहेरच्या खेळाडूंना आणले जाऊ शकते. त्यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन यांसारखी नावे आघाडीवर आहेत.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

    follow whatsapp